मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ranji Trophy 2024 : मोहम्मद शमीच्या धाकट्या भावाची रणजी क्रिकेटमध्ये एन्ट्री, या संघाकडून केलं पदार्पण

Ranji Trophy 2024 : मोहम्मद शमीच्या धाकट्या भावाची रणजी क्रिकेटमध्ये एन्ट्री, या संघाकडून केलं पदार्पण

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 06, 2024 03:41 PM IST

Mohammed Kaif Ranji Debut : भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा धाकटा भाऊ मोहम्मद कैफने रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. कैफने बंगालकडून रणजीमध्ये पदार्पण केले. कैफ हाही वेगवान गोलंदाज आहे.

Ranji Trophy 2024
Ranji Trophy 2024

Mohammed Shami Brother Mohammed Kaif Ranji Debut : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीच्या भावाने रणजी क्रिकेटमध्ये एन्ट्री केली आहे. शमीचा धाकटा भाऊ मोहम्मद कैफ देखील वेगवान गोलंदाज आहे. २७ वर्षीय मोहम्मद कैफने मोठ्या संघर्षानंतर बंगालकडून रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपूर्वी मोहम्मद शमीदेखील बंगालकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला आहे. आता कैफही मोठा भाऊ शमीच्या पावला पाऊल ठेवताना दिसत आहे. मोहम्मद शमी आपल्या भावाच्या रणजी पदार्पणामुळे खूप आनंदी आहे.

शमीने भाऊ कैफचे अभिनंदन करताना सोशल मीडियावर पोस्ट केली आहे, तो म्हणाला की, "दीर्घ संघर्षानंतर, अखेरीस, तुला बंगालसाठी रणजी ट्रॉफी कॅप मिळाली. चिअर्स! अभिनंदन, मी तुला भविष्यासाठी शुभेच्छा देतो." तुझे १००% दे आणि कठोर परिश्रम घे आणि चांगले करत रहा."

शमीच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टवर अनेक अप्रतिम प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने 'शुभेच्छा' अशी कमेंट केली आहे.

कैफनेही कमेंट करून मोठा भाऊ शमीचे आभार मानले आहेत. याशिवाय गुजरात टायटन्सने शमीच्या पोस्टवर "बडे मियाँ, बडे मियाँ. छोटे मियाँ सुभानअल्लाह." अशी कमेंट केली आहे.

कैफची आतापर्यंतची कारकीर्द

मोहम्मद शमीच्या धाकट्या भावाने रणजी पदार्पणापूर्वी त्याच्या कारकिर्दीत ९ लिस्ट-ए सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या ९ डावात गोलंदाजी करताना त्याने १२ बळी घेतले आणि फलंदाजी करताना ५ डावात २३ धावा केल्या.

आंध्र प्रदेशविरुद्ध रणजी पदार्पण

शमीचा भाऊ मोहम्मद कैफने आंध्र प्रदेशविरुद्ध रणजी पदार्पण केले आहे. विशाखापट्टणम येथील राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर आंध्रविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात बंगालच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कैफचा समावेश करण्यात आला. हा सामना ५ जानेवारीपासून खेळला जात आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या बंगालने पहिल्या दिवशी ४ गडी गमावून २८९ धावा केल्या होत्या.

WhatsApp channel