Mohammed Shami : शमीची तुफानी फलंदाजी, १०व्या क्रमांकावर येऊन दिला चौकार-षटकारांचा तडाखा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Mohammed Shami : शमीची तुफानी फलंदाजी, १०व्या क्रमांकावर येऊन दिला चौकार-षटकारांचा तडाखा

Mohammed Shami : शमीची तुफानी फलंदाजी, १०व्या क्रमांकावर येऊन दिला चौकार-षटकारांचा तडाखा

Dec 09, 2024 02:01 PM IST

Mohammed Shami In SMAT 2024 : गोलंदाजीनंतर आता मोहम्मद शमीने फलंदाजीतही कमाल दाखवली आहे. बंगालकडून त्याने ३२ धावांची स्फोटक खेळी खेळली आहे.

Mohammed Shami : शमीची तुफानी फलंदाजी, शमीनं १०व्या क्रमांकावर येऊन चौकार-षटकारांचा तडाखा
Mohammed Shami : शमीची तुफानी फलंदाजी, शमीनं १०व्या क्रमांकावर येऊन चौकार-षटकारांचा तडाखा

Syed Mushtaq Ali Trophy 2024 : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या तुफान फॉर्मात आहे. त्याने अनेक वेळा गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे. आता शमीने फलंदाजीतही ताकद दाखवली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४ च्या पहिल्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये शमीने स्फोटक फलंदाजी केली.

बंगालकडून त्याने नाबाद ३२ धावा केल्या. यादरम्यान त्याने २ षटकार आणि ३ चौकार लगावले. शमीच्या खेळीच्या जोरावर बंगालने चंदीगडला विजयासाठी १६० धावांचे लक्ष्य दिले.

बंगालचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आला. चंदीगडविरुद्धच्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी २० षटकांत ९ गडी गमावून १५९ धावा केल्या. यादरम्यान सलामीवीर करण लालने ३३ धावा केल्या. करणने १ चौकार आणि २ षटकार मारले. हृतिक चॅटर्जीने १२ चेंडूत २८ धावा केल्या. त्याने ३ षटकार आणि २ चौकार मारले. प्रदिप्ता प्रामाणिकने ३० धावांची खेळी केली.

शमीने शेवटच्या षटकात केली स्फोटक फलंदाजी -

बंगालसाठी शमी दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. यादरम्यान त्याने १७ चेंडूंचा सामना करत नाबाद ३२ धावा केल्या. शमीच्या या खेळीत ३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. अखेरच्या षटकात त्याने १८ धावा केल्या.

संदीप शर्माच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर शमीने षटकार ठोकला. यानंतर चौथ्या चेंडूवर दोन धावा झाल्या. त्याने पुन्हा पाचव्या चेंडूवर षटकार ठोकला. शमीने शेवटच्या चेंडूवर चौकार मारला. अशा प्रकारे बंगालच्या शेवटच्या षटकात १८ धावा झाल्या.

बंगालने उपांत्यपूर्व फेरीपूर्वी सलग तीन सामने जिंकले होते. त्यांनी राजस्थानचा ७ विकेट्सने पराभव केला. यानंतर बिहारचा ९ गडी राखून पराभव केला. तर मेघालयचा ६ गडी राखून पराभव केला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या