Hasin Jahan Instagram Post : भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ नेहमीच चर्चेत असते. आता ती एका इंस्टाग्राम पोस्टमुळे वादात सापडली आहे. हसीन जहाँने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि त्याची मुलगी समायरा यांचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोच्या माध्यमातून तिने मोहम्मद शमीवर हल्ला चढवला आहे.
इंस्टाग्राम पोस्टमध्ये हसीन जहाँने मोहम्मद शमीवर निशाणा साधला आहे. हसीन जहाँने आपल्या मुलीच्या आयुष्यात वडिलांच्या भूमिकेबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने वडील आणि मुलीच्या प्रेमळ नात्याबद्दल लिहिले आहे. पण यात तिने शमीचे वर्णन एक वाईट पिता म्हणून केले आहे.
हसीन जहाँने तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, की बहुतेक वडिलांना त्यांच्या मुलीच्या छोट्या कुशीत शांती मिळते. आणि काही बाप वेश्यांच्या कुशीत असतात! शमीवर जोरदार हल्ला चढवत ती पुढे म्हणाली, “अल्लाह कोणत्याही मुलीला चारित्र्यहीन बाप देऊ नये. मी अल्लाहकडे माझ्या लहान मुलीला धीर देण्याची प्रार्थना करते.”
यानंतर आता हसीन जहाँच्या या इन्स्टाग्राम पोस्टवर यूजर्स जोरदार कमेंट करत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून तिच्या पतीबद्दल वैयक्तिक वक्तव्ये केल्याबद्दल चाहत्यांनी तिच्यावर टीका केली आहे. एका इंस्टाग्राम युजरने तिला, "ड्रामा क्वीन'देखील म्हटले आहे.
तर दुसऱ्या युजरने रोहित शर्माचा फोटो वापरण्यावर आक्षेप घेतला आहे. चिडलेल्या युजरने म्हटले आहे की, "तुझ्यासारखी आई कोणालाही देऊ नये."
दरम्यान, क्रिकेटर मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यातील नाते सोशल मीडियावर चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. अनेकवेळा तिने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून शमीवर हल्ला चढवला आहे.