Mohammad Rizwan : असं कोण आऊट होतं का? चाहत्यांनी उडवली रिझवानची खिल्ली, व्हिडीओ पाहा
Mohammad Rizwan Run Out : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर पाकिस्तानने निर्धारित ५० षटकात ६ बाद ३४२ धावा केल्या आहेत.
Mohammad Rizwan Run Out video : आशिया कप 2023च्या पहिल्या सामन्यात बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघ नेपाळचा सामना करत आहे. पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यातील सामना मुलतानमध्ये खेळला जात आहे.
ट्रेंडिंग न्यूज
या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर पाकिस्तानने निर्धारित ५० षटकात ६ बाद ३४२ धावा केल्या आहेत. त्यांच्याकडून कर्णधार बाबर आझमने १५१ आणि इफ्तिखार अहमदने नाबाद १०९ धावा केल्या.
रिझवान विचित्र पद्धतीने धावबाद
दरम्यान, सोशल मीडियावर या सामन्याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मोहम्मद रिझवानचा आहे. पाकिस्तानचा विकेटकीपर फलंदाज मोहम्मद रिझवान ज्या पद्धतीने धावबाद झाला, त्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
वास्तविक, पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान ज्या प्रकारे धावबाद झाला, तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मीडिया यूजर्स कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांचे म्हणणे आहे की, मोहम्मद रिझवान काही वर्षांपूर्वी असाच धावबाद झाला होता. सोशल मीडियावर मोहम्मद रिजवानची खूप खिल्ली उडवली जात आहे.
बाबर-इफ्तिकारची वादळी शतकं
टॉस जिंकून पाकिस्तानने निर्धारित ५० षटकांत ६ बाद ३४२ धावा केल्या. त्यांच्याकडून बाबर आझमने सर्वाधिक १५१ धावा केल्या. त्याने १३१ चेंडूंच्या खेळीत १४ चौकार आणि ४ षटकार मारले. तर इफ्तिखार अहमदने ७१ चेंडूत १०९ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ११ चौकार आणि ४ षटकार मारले. बाबरच्या कारकिर्दीतील हे १९ वे शतक आहे. त्याचवेळी इफ्तिखारने आपले पहिलेच वनडे शतक झळकावले.
बाबर आणि इफ्तिकार यांच्यात ५ व्या विकेटसाठी वादळी २१४ धावांची भागिदारी झाली.