SA vs PAK ODI : मोहम्मद रिझवान आणि क्लासेन यांची एकमेकांना शिवीगाळ, चालू सामन्यात झाला राडा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SA vs PAK ODI : मोहम्मद रिझवान आणि क्लासेन यांची एकमेकांना शिवीगाळ, चालू सामन्यात झाला राडा

SA vs PAK ODI : मोहम्मद रिझवान आणि क्लासेन यांची एकमेकांना शिवीगाळ, चालू सामन्यात झाला राडा

Dec 20, 2024 03:10 PM IST

Mohammad Rizwan Heinrich Klaasen Fight : पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना केपटाऊनमध्ये खेळला गेला. या सामन्यादरम्यान मोहम्मद रिझवान आणि हेनरिक क्लासेन यांच्यात वाद झाला.

SA vs PAK ODI : मोहम्मद रिझवान आणि क्लासेन यांची एकमेकांना शिवीगाळ, चालू सामन्यात घडला राडा
SA vs PAK ODI : मोहम्मद रिझवान आणि क्लासेन यांची एकमेकांना शिवीगाळ, चालू सामन्यात घडला राडा (Screengrab - X )

Mohammad Rizwan SA vs PAK : दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी केपटाऊनमध्ये खेळला गेला. या सामन्यादरम्यान मोहम्मद रिझवान, हारिस रौफ आणि हेनरिक क्लासेन यांच्यात तुफान राडा झाला. हे प्रकरण इतकं वाढलं की अंपायरला बचावासाठी यावं लागलं.

दोन्ही संघाच्या या खेळाडूंनी एकमेकांना शिवीगाळ केल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, आयसीसीने या प्रकरणाची अद्याप दखल घेतलेली नाही.

वास्तविक, गुरुवारी पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ५० षटकात ३२९ धावा केल्या. यादरम्यान रिझवानने ८० धावांची दमदार खेळी केली. त्याने ७ चौकार आणि ३ षटकार मारले.

तर बाबर आझमने ७३ धावांची खेळी केली. पाकिस्तानने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा संघ २४८ धावांवरच गारद झाला आणि सामना गमावला.

रिजवान आणि क्लासेनमध्ये भांडण

दक्षिण आफ्रिकेचा संघ फलंदाजी करत होता. तेव्हा त्यांच्या डावाच्या २६व्या षटकात हा गोंधळ झाला. पाकिस्तानसाठी हे षटक टाकण्यासाठी हरिस रौफ आला. क्रिकबझच्या वृत्तानुसार, ओव्हरच्या शेवटच्या चेंडूनंतर रौफने क्लासेनकडे पाहत काहीतरी म्हटले. हे क्लासेनला आवडले नाही. या दरम्यान, रिझवानही तेथे पोहोचला आणि प्रकरण वाढले आणि खूपच गंभीर झाले.

रिझवान आणि क्लासेनच्या वादाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही. आयसीसीनेही याप्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.

क्लासेनची स्फोटक खेळी 

दक्षिण आफ्रिकेला पाकिस्तानविरुद्ध ८१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. क्लासेन शेवटपर्यंत संघासाठी लढत राहिला. त्याने ९७ धावांची स्फोटक खेळी खेळली. क्लासेनचे शतक हुकले. ७४ चेंडूंचा सामना करताना त्याने ८ चौकार आणि ४ षटकार मारले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या