Prithvi Shaw : दिल्ली कॅपिटल्सच्या माजी कोचनं केली पृथ्वी शॉची पोलखोल! खरेदीदार का मिळाला नाही? खरं कारण सांगितलं
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Prithvi Shaw : दिल्ली कॅपिटल्सच्या माजी कोचनं केली पृथ्वी शॉची पोलखोल! खरेदीदार का मिळाला नाही? खरं कारण सांगितलं

Prithvi Shaw : दिल्ली कॅपिटल्सच्या माजी कोचनं केली पृथ्वी शॉची पोलखोल! खरेदीदार का मिळाला नाही? खरं कारण सांगितलं

Nov 26, 2024 10:54 PM IST

Mohammad Kaif On Prithvi Shaw Ipl Auction : आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात पृथ्वी शॉ अनसोल्ड राहिल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या कोचिंग स्टाफचा माजी सदस्य असलेल्या मोहम्मद कैफीने पृथ्वीची पोलखोल केली आहे. सोबतच पृथ्वीला खरेदीदार का मिळाला नाही, याचे खरे कारणही सांगितले आहे.

Prithvi Shaw : दिल्ली कॅपिटल्सच्या माजी कोचनं केली पृथ्वी शॉची पोलखोल! खरेदीदार का मिळाला नाही? खरं कारण सांगितलं
Prithvi Shaw : दिल्ली कॅपिटल्सच्या माजी कोचनं केली पृथ्वी शॉची पोलखोल! खरेदीदार का मिळाला नाही? खरं कारण सांगितलं (AP)

एक काळ असा होता की पृथ्वी शॉ याला टीम इंडियाचे भविष्य म्हटले जायचे. क्रिकेट तज्ज्ञ पृथ्वी शॉबद्दल म्हणायचे की त्याच्यामध्ये सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागची झलक आहे. पृथ्वीच्या खेळातही हे दिसून आले. तो ज्या पद्धतीने फटके मारायचा ते मला सचिन आणि सेहवागची आठवण करून देत असे.

पृथ्वी शॉ हा प्रतिभावान खेळाडू आहे यात शंका नाही, पण स्टारडम मिळताच तो ते सांभाळू शकला नाही. त्याचा परिणाम असा झाला की आज तो टीम इंडिया किंवा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कुठेच नाही. इंडियन प्रीमियर लीगच्या लिलावातही त्याला कोणत्याच संघाने खरेदी केले नाही.

IPL २०२५ च्या मेगा लिलावात, पृथ्वी शॉने स्वतःला ७५ लाख रुपयांच्या मूळ किमतीत सूचीबद्ध केले होते. सलामीवीर फलंदाजाच्या स्थानावर काही संघ पृथ्वीला नक्कीच विकत घेईल, अशी अपेक्षा होती, पण परिस्थिती अशी होती की, कोणत्याही संघाने पृथ्वीवर स्वारस्य दाखवले नाही. लिलावासाठी ब्रॉडकास्ट टीमचा सदस्य असलेला मोहम्मद कैफ हाही पृथ्वी शॉबाबत खूप निराश झाला होता.

मोहम्मद कैफ दिल्लीच्या कोचिंग स्टाफचा माजी सदस्य

जिओ सिनेमाच्या ब्रॉडकास्ट टीममध्ये तज्ज्ञ म्हणून समाविष्ट असलेला मोहम्मद कैफ एकेकाळी दिल्ली कॅपिटल्स टीमशी संबंधित होता. कैफ संघातील कोचिंग स्टाफचा सदस्य होता. कैफने पृथ्वीबद्दल काही गोष्टी शेअर केल्या ज्या खूपच आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहेत.

कैफने सांगितले, 'एकेकाळी टीम मॅनेजमेंट पृथ्वीबाबत खूप कडक होते. त्याला संघातून वगळण्यावरही एकमत झाले होते, पण सामन्याच्या आधी प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांना वाटत होते की पृथ्वीने सामन्यात चांगली कामगिरी केली तर आपण जिंकू. अशा रितीने पृथ्वीला लागोपाठ अनेक संधी मिळाल्या, पण तो आपल्या खेळात सुधारणा करू शकला नाही.

केफ पुढे म्हणाला, 'पृथ्वीला चांगले खेळण्याची क्षमता नव्हती असे नाही, त्याने ६ चेंडूत ६ चौकारही मारले आहेत. मात्र, कालांतराने त्याने आपल्या फिटनेसकडे लक्ष दिले नाही. याशिवाय इतरही अनेक गोष्टी होत्या ज्यांचा त्याच्या खेळावर परिणाम झाला आणि त्याचा परिणाम आजही सर्वांसमोर आहे. पृथ्वी शॉसाठी ही लाजीरवाणी बाब आहे.

Whats_app_banner