Mohammad Kaif Dip In Sangam, Maha Kumbh 2025 : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे १३ जानेवारीपासून महाकुंभाचे आयोजन करण्यात येणार आहे. या दरम्यान, टीम इंडियाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफ याने प्रयागराज येथे पोहोचून संगममध्ये स्नान केले. कैफने डुबकी मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या डुबकीच्या व्हिडिओला माजी भारतीय खेळाडूने एक मजेदार कॅप्शनही दिले आहे. कॅप्शनमध्ये कैफने लिहिले, "अरे, मी याच यमुनेत पोहायला शिकलो आहे."
कैफ बोटीतून थेट पाण्यात डुबकी मारतो आणि नंतर काही वेळ पोहतो. यादरम्यान कैफचा मुलगा बोटीवर बसलेला दिसत आहे.
मोहम्मद कैफने कडाक्याच्या थंडीत यमुना नदीत उडी घेतली. यामुळे त्याच्या धाडसाचे कौतुक होत आहे. पण त्याच्या सोशल मीडिया पोस्टच्या कॅप्शनने खरी चर्चा मिळवली आहे. त्याने लिहिले, की “अबे इसी जमुना में तैराकी सीखा हूं.”
कैफने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तो हसून म्हणतो, उडी मारू का, त्यानंतर त्याच्यासोबतचे लोक म्हणतात, हो उडी मार. तो आपल्या मुलालाही विचारतो, काय करू, यावर त्याचा मुलगा म्हणतो की डूबिएगा नहीं. यानंतर हसत कैफने नदीत उडी मारली.
मोहम्मद कैफने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १३ कसोटी आणि १२५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. कैफने कसोटीच्या २२ डावात ३२.८४ च्या सरासरीने ६२४ धावा केल्या. या दरम्यान, त्याने १ शतक आणि ३ अर्धशतके केली, ज्यामध्ये उच्च धावसंख्या १४८* धावा होती.
याशिवाय कैफने एकदिवसीय सामन्यांच्या ११० डावांमध्ये ३२.०१ च्या सरासरीने २७५३ धावा केल्या आहेत. यादरम्यान, त्याने २ शतके आणि १७ अर्धशतके केली, ज्यामध्ये सर्वोच्च धावसंख्या १११* धावा होती.
कैफने २००० ते २००६ दरम्यान भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले होते. कैफला त्याच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी ओळखले जायचे. त्याच्या क्षेत्ररक्षणाची सर्वाधिक चर्चा झाली.
संबंधित बातम्या