IPL 2025 : धोनीसाहेब जोपर्यंत खेळत राहतील तोपर्यंत… मोहम्मद कैफचा थालाला टोमणा! वक्तव्याची तुफान चर्चा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2025 : धोनीसाहेब जोपर्यंत खेळत राहतील तोपर्यंत… मोहम्मद कैफचा थालाला टोमणा! वक्तव्याची तुफान चर्चा

IPL 2025 : धोनीसाहेब जोपर्यंत खेळत राहतील तोपर्यंत… मोहम्मद कैफचा थालाला टोमणा! वक्तव्याची तुफान चर्चा

Published Oct 05, 2024 08:34 AM IST

Mohammad Kaif on MS Dhoni IPL 2025 Uncapped Player : धोनी जोपर्यंत खेळत राहील तोपर्यंत इंडियन प्रीमियर लीगचे नियम बदलत राहतील, असे वक्तव्य माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने केले आहे. धोनीने IPL २०२४ मध्ये १४ सामन्यात एकूण १६१ धावा केल्या होत्या.

IPL 2025 : धोनीसाहेब जोपर्यंत खेळत राहतील तोपर्यंत… मोहम्मद कैफ हे काय बोलून बसला! वक्तव्याची तुफान चर्चा
IPL 2025 : धोनीसाहेब जोपर्यंत खेळत राहतील तोपर्यंत… मोहम्मद कैफ हे काय बोलून बसला! वक्तव्याची तुफान चर्चा (AFP)

एमएस धोनी आयपीएल २०२५ मध्ये खेळेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही परंतु अनकॅप्ड खेळाडू नियम लागू झाल्यामुळे त्याच्या खेळण्याची शक्यता वाढली आहे.

या दरम्यान, धोनी जोपर्यंत खेळत राहील तोपर्यंत इंडियन प्रीमियर लीगचे नियम बदलत राहतील, असे वक्तव्य माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने केले आहे. धोनीने IPL २०२४ मध्ये १४ सामन्यात एकूण १६१ धावा केल्या होत्या.

एका मीडिया मुलाखतीत मोहम्मद कैफ म्हणाला, "आपण एमएस धोनीला पुन्हा खेळताना पाहणार आहोत. तो तंदुरुस्त आहे, २०० च्या स्ट्राईक रेटने खेळत आहे, त्यामुळे जोपर्यंत तो खेळत राहील तोपर्यंत आयपीएलचे नियम बदलत राहतील असे मला वाटते. .

त्याला आयपीएलमध्ये खेळायचे असेल तर तो खेळत राहील. तो खूप मोठा खेळाडू आहे, मोठा मॅचविनर आहे आणि CSK चा उत्कृष्ट लीडर आहे.”

'धोनी साहेबांसाठी नियम बदलत राहणार'

मोहम्मद कैफने महेंद्रसिंह धोनीला आपल्या वक्तव्यात 'साहेब' म्हटले आहे. तो म्हणाला, "माझ्या मते नियम बदलणे योग्य आहे. जर तो चांगला खेळत असेल आणि तंदुरुस्त असेल, तर त्याला खेळू का दिले जाऊ नये. धोनी साहेबांसाठी नियम बदलला आहे हे सर्वांना माहीत आहे. धोनीसारख्या खेळाडूसाठी नियम का बदलू नयेत."

CSK मॅनेजमेंट काय म्हणाले?

एमएस धोनीला अनकॅप्ड खेळाडू नियमात बसवण्याची जोरदार चर्चा आहे. अशा परिस्थितीत सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी सांगितले की, धोनी सध्या यूएसएमध्ये सुट्टी घालवत आहे आणि अद्याप त्याच्याशी कोणत्याही विषयावर चर्चा झालेली नाही.

Mohammad Kaif felt that MS Dhoni’s legacy warrants such considerations
Mohammad Kaif felt that MS Dhoni’s legacy warrants such considerations

धोनीला रिटेन करण्यासाठी CSK अनकॅप्ड खेळाडू नियम वापरू शकत नाही, सोबतच असेही त्यांनी स्पष्ट केले. चेन्नई सुपर किंग्जच्या व्यवस्थापनाला ३१ ऑक्टोबरपर्यंत धोनीबाबत निर्णय घ्यायचा आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या