मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Mohammad Amir : मोहम्मद आमिरला व्हिसा मिळेना! टी-20 वर्ल्डकप खेळण्याची संधी गमावणार?

Mohammad Amir : मोहम्मद आमिरला व्हिसा मिळेना! टी-20 वर्ल्डकप खेळण्याची संधी गमावणार?

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 06, 2024 04:15 PM IST

Mohammad Amir Visa Issue T20 World Cup 2024 : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला २०२४ च्या T20 विश्वचषकापूर्वी व्हिसाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. आमिरने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे.

Mohammad Amir Visa Issue  : मोहम्मद आमिरला व्हिसा मिळेना! टी-20 वर्ल्डकप खेळण्याची संधी गमावणार?
Mohammad Amir Visa Issue : मोहम्मद आमिरला व्हिसा मिळेना! टी-20 वर्ल्डकप खेळण्याची संधी गमावणार? (Action Images via Reuters)

Mohammad Amir Visa Issue : आगामी टी-20 वर्ल्डकपपूर्वी पाकिस्तानी संघ टी-20 मालिकेसाठी आयर्लंड आणि इंग्लंडचा दौरा करणार आहे. पाकिस्तान प्रथम आयर्लंड जाईल. पाकिस्तान-आयर्लंड टी-20 मालिका १० मे पासून सुरू होणार आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

पाकिस्तान आणि आयर्लंड यांच्यात ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. मात्र या दौऱ्यापूर्वी पाकिस्तानसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. खरं तर, संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला या दौऱ्यासाठी व्हिसा मिळू शकलेला नाही.

टी-20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तानसाठी ही खूप महत्त्वाची मालिका आहे. अशा स्थितीत संघाच्या स्टार खेळाडूला व्हिसा न मिळणे ही खूप गंभीर बाब आहे. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले की, टीम मॅनेजमेंटकडून मिळालेल्या माहितीनुसार आमिरच्या आयर्लंडला जाण्यास विलंब होणार आहे. टी-20 मालिकेसाठी तो संघासोबत आयर्लंडला रवाना होणार नाही.

पाकिस्तानचा संघ उद्या आयर्लंडला रवाना होईल, मात्र आमिर त्यांच्यासोबत जाणार नाही, असे या अहवालात म्हटले आहे. व्हिसाचा प्रश्न सुटताच आमिर आयर्लंडला रवाना होईल, असेही सांगण्यात आले. 

विशेष म्हणजे, मोहम्मद आमीरसोबत असे घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१८ मध्येही आमिरला अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला होता.

दरम्यान, टी-20 विश्वचषकापूर्वी मोहम्मद आमिरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती मागे घेऊन पुनरागमन केले होते. अलीकडेच आमिरने न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या ५ T20 सामन्यांच्या मालिकेद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. यानंतर आमिरची आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठीही निवड झाली. मात्र, पाकिस्तानचा संघ टी-२० विश्वचषकासाठी अद्याप पोहोचलेला नाही. आता आमिर टी-20 वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळवू शकतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

IPL_Entry_Point