Ind vs Aus : गाबाच्या मैदानावर भारताचे केवळ ४ शतकवीर, पहिलं शतक कोणी केलं? पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ind vs Aus : गाबाच्या मैदानावर भारताचे केवळ ४ शतकवीर, पहिलं शतक कोणी केलं? पाहा

Ind vs Aus : गाबाच्या मैदानावर भारताचे केवळ ४ शतकवीर, पहिलं शतक कोणी केलं? पाहा

Dec 12, 2024 02:48 PM IST

IND vs AUS 3rd Test 2024 : गाबाच्या मैदानावर आतापर्यंत केवळ एमएल जयसिम्हा, सुनील गावस्कर, सौरव गांगुली आणि मुरली विजय या ४ भारतीय फलंदाजांना कसोटी शतक झळकावता आले आहे.

Ind vs Aus : गाबाच्या मैदानावर आतापर्यंत केवळ ४ भारतीय फलंदाजांना शतक करता आलं, पहिलं शतक कोणी केलं? पाहा
Ind vs Aus : गाबाच्या मैदानावर आतापर्यंत केवळ ४ भारतीय फलंदाजांना शतक करता आलं, पहिलं शतक कोणी केलं? पाहा

टीम इंडियाने पर्थ कसोटी जिंकून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची दमदार सुरुवात केली. मात्र, कांगारूंनी ॲडलेडमध्ये पलटवार करत टीम इंडियाचा १० गडी राखून पराभव केला. सध्या ५ कसोटी सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. आता मालिकेतील तिसरा सामना १४ डिसेंबरपासून ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर रंगणरा आहे.

सर्वांचे लक्ष गब्बा कसोटी सामन्याकडे लागले आहे. भारताने २०२१ मध्ये गाबा कसोटी सामना जिंकून इतिहास रचला होता. 

गाबाच्या मैदानावर आतापर्यंत केवळ एमएल जयसिम्हा, सुनील गावस्कर, सौरव गांगुली आणि मुरली विजय या ४ भारतीय फलंदाजांना कसोटी शतक झळकावता आले आहे.

एमएल जयसिम्हा गाबाचे पहिले शतकवीर

गाबाच्या मैदानावर भारताकडून पहिले कसोटी शतक १९६८ साली आले. त्यावेळी एमएल जयसिम्हा यांनी १०१ धावांची खेळी केली होती. मात्र टीम इंडियाला विजयाची नोंद करण्यात अपयश आले. 

त्यानंतर १९७७ मध्ये सुनील गावस्कर यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध याच मैदानावर ११३ धावांची खेळी केली होती. तो सामना भारताने १६ धावांनी गमावला होता.

मुरली विजयने खेळली १४४ धावांची खेळी

यानंतर २००३ मध्ये सौरव गांगुली याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध गाबा येथे १४४ धावांची शानदार खेळली. हा कसोटी सामना अनिर्णित राहिला.

२०१४ साली मुरली विजयने याच मैदानावर १४४ धावांची इनिंग खेळली होती. पण तरीही टीम इंडियाला विजय काही मिळाला नाही. गाबा मैदानावर शतके झळकावणारे चारही भारतीय खेळाडू आता निवृत्त झाले आहेत. २०१४ नंतर एकाही भारतीय फलंदाजाला गाब्बाच्या मैदानावर कसोटी शतक झळकावता आलेले नाही.

गाबा येथे कसोटीत सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज

एमएल जयसिम्हा- १७५ धावा

मुरली विजय-१७१ धावा

अजिंक्य रहाणे- १५२ धावा

सौरव गांगुली- १४४ धावा

चेतेश्वर पुजारा- १४२ धावा

२०२१ मध्ये गाबा कसोटीत विजय

भारतीय संघाने आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध गाब्बा मैदानावर एकूण ७ कसोटी सामने खेळले असून त्यापैकी केवळ एकच सामना जिंकू शकला आहे. टीम इंडियाला ५ सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. तर एक सामना अनिर्णित राहिला. 

२०२१ मध्ये अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात झालेल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्या सामन्या शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांनी चांगली फलंदाजी केली होती.

Whats_app_banner

संबंधित बातम्या