२४.७५ कोटी कशासाठी? तर यासाठी... मिचेल स्टार्कनं टाकला आयपीएलचा सर्वोत्तम चेंडू, अभिषेक शर्माला काही समजलेच नाही
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  २४.७५ कोटी कशासाठी? तर यासाठी... मिचेल स्टार्कनं टाकला आयपीएलचा सर्वोत्तम चेंडू, अभिषेक शर्माला काही समजलेच नाही

२४.७५ कोटी कशासाठी? तर यासाठी... मिचेल स्टार्कनं टाकला आयपीएलचा सर्वोत्तम चेंडू, अभिषेक शर्माला काही समजलेच नाही

May 26, 2024 09:27 PM IST

mitchell starc bowled best delivery of ipl 2024 : आयपीएल २०२४ चा अंतिम सामना आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्य हैदराबाद यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात केकेआरच्या मिचेल स्टार्कने आयपीएल २०२४ चा सर्वोत्तम चेंडू टाकला.

२४.७५ कोटी कशासाठी? तर यासाठी... अभिषेक शर्मा चेंडू दिसलाच नाही, स्टार्कनं टाकला आयपीएल २०२४ चा सर्वोत्तम चेंडू
२४.७५ कोटी कशासाठी? तर यासाठी... अभिषेक शर्मा चेंडू दिसलाच नाही, स्टार्कनं टाकला आयपीएल २०२४ चा सर्वोत्तम चेंडू

mitchell starc bowled best delivery of ipl 2024 : इंडियन प्रीमियर लीग २०२४ ची फायनल आज (२६ मे) कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्य हैदराबाद यांच्यात होत आहे. दोन्ही संघ चेन्नईच्या चेपॉक क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने आहेत.

या सामन्यात हैदराबादने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली. पण केकेआरच्या गोलंदाजांनी त्यांचा निर्णय चुकीचा ठरवला. मिचेल स्टार्कने तुफानी गोलंदाजी करत हैदराबादचे कंबरडे मोडले. हैदराबादचा डाव १८ षटकात ११३ धावांवर आटोपला. आता चॅम्पियन बनण्यासाठी केकेआरला ११४ धावा करायच्या आहेत.

पण तत्पूर्वी, मिचेल स्टार्कने या आयपीएलमधला सर्वोत्तम चेंडू टाकला आहे. वास्तविक, मिचेल स्टार्क हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. आयपीएल २०२४ च्या आधी झालेल्या मिनी लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने स्टार्कला २४.७५ कोटी रुपयांना विकत घेतले होते. यानंतर सुरुवातीच्या सामन्यांमध्ये स्टार्क लयीत दिसत नव्हता. यामुळे त्याला प्रचंड ट्रोल केले जात होते. पण प्लेऑफ सामन्यांमध्ये त्याने धुमाकूळ घातला आहे.

आता स्पर्धेतील सर्वात महागड्या खेळाडूने सनरायझर्स हैदराबादच्या अभिषेक शर्माला IPL २०२४ चा सर्वोत्तम चेंडू टाकला. स्टार्कचा चेंडू 'अनप्लेएबल' होता.

स्टार्कच्या या जबरदस्त चेंडूवर अभिषेक शर्माची बत्ती गूल झाली. स्टार्कने टाकलेला हा चेंडू कोणत्याही डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजासाठी ड्रीम बॉल असतो. स्टार्कच्या या शानदार चेंडूचा व्हिडिओ आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडियावरून शेअर करण्यात आला आहे.

स्टार्कचा चेंडू मिडल स्टंपच्या लाईवर पडतो आणि नंतर तो अचानक आऊट स्विंग होऊन स्टंपवर आदळतो. यानंतर अभिषेकला दोन सेंकद आपल्यासोबत काय झाले हे कळलेच नाही.

स्टार्कचा चेंडू अभिषेकला समजू शकला नाही. अभिषेकची बॅट खाली येईपर्यंत चेंडू स्टंपवर आदळला. अभिषेक शर्मा ५ चेंडूत २ धावा करून बाद झाला. या चेंडूचा वेग ताशी १४० किमी इतका होता.

क्वालिफायर-१ मध्येही जबरदस्त गोलंदाजी

याआधी कोलकात्याच्या मिचेल स्टार्कने हैदराबादविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या क्वालिफायरमध्येही आपल्या शानदार गोलंदाजीने धुमाकूळ घातला होता. या स्पर्धेतील पहिला क्वालिफायर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात केकेआरने ८ गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली होती.

या सामन्यात स्टार्कने ४ षटकात ३४ धावा देऊन केकेआरकडून ३ बळी घेतले होते. या चमकदार कामगिरीसाठी स्टार्कला 'प्लेअर ऑफ द मॅच'चा किताब देण्यात आला. आता फायनलमध्येही स्टार्क चमकदार कामगिरी केली आहे.

Whats_app_banner