मिचेल स्टार्क क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महान गोलंदाज ठरला आहे. स्टार्क हा एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅटच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. त्याने श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला मागे टाकले आहे.
मलिंगाने आपल्या कारकिर्दीत विश्वचषक सामन्यांमध्ये ९४ बळी घेतले होते. आता मिचेल स्टार्कने त्याला मागे टाकत ९५ बळींचा टप्पा गाठला आहे. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाने टी-20 विश्वचषक २०२४ मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात या ऐतिहासिक आकड्याला स्पर्श केला.
T20 विश्वचषक २०२४ चा ४४ वा सामना ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात खेळला गेला. हा सुपर-८ स्टेजचा सामना होता, ज्यामध्ये स्टार्कने तन्झीद हसनला बोल्ड केले आणि त्याच्या कारकिर्दीतील विश्वचषकातील ९५ वी विकेट घेतली. सामन्याच्या पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर स्टार्कने तनजीदला बाद केले.
स्टार्कने वर्ल्ड कपमध्ये मलिंगापेक्षा कमी डावात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. मलिंगाने विश्वचषकातील ५९ डावांत ९४ विकेट घेतल्या होत्या, तर स्टार्कने केवळ ५२ डावांत ९५ विकेट घेतल्या. या यादीत बांगलादेशचा स्टार अष्टपैलू शाकिब अल हसन तिसऱ्या स्थानावर आहे. शाकिबने ७५ डावात ९२ विकेट घेतल्या आहेत.
मिचेल स्टार्क- ५२ डाव- ९५ विकेट्स
लसिथ मलिंगा- ५९ डाव- ९४ विकेट्स
शकीब अल हसन- ७५ डाव- ९२ विकेट्स
ट्रेंट बोल्ट- ४७ डाव- ८७ विकेट्स
मुथय्या मुरलीधरन- ४८ डाव- ७९ विकेट्स
टीम सौदी- ४७ डाव- ७७ विकेट्स
ग्लेन मॅकग्रा (फक्त एकदिवसीय विश्वचषक) – ३९ डाव – ७१ विकेट्स
मोहम्मद शमी- ३२ डाव- ६९ विकेट्स
शाहिद आफ्रिदी- ५८ डाव-६९ विकेट्स
ॲडम झाम्पा- ३४ डाव- ६२ विकेट्स.
संबंधित बातम्या