इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा २२ वा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क केकेआरसाठी आपली छाप सोडू शकला नाही.
इतकेच नाही तर आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू कदाचित जखमी झाला आहे. असे झाल्यास कोलकाता नाईट रायडर्ससाठी हा सर्वात मोठा धक्का असणार आहे. केकेआर आणि त्यांच्या चाहत्यांना या हंगामात मिचेल स्टार्ककडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र आजपर्यंत तो अपेक्षेप्रमाणे कामगिरी शकला नाही.
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी आणि वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला IPL २०२४ साठी च्या मिनी लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने २४.७५ कोटी रुपयांची मोठी रक्कम देऊन विकत घेतले. तो आतापर्यंतच्या आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे. मात्र, या हंगामात आतापर्यंत त्याने त्याच्या क्षमतेनुसार कोणतेही काम केलेले नाही. तो अजिबात लयीत दिसत नाही.
स्टार्कने आतापर्यंत खेळलेल्या ३ सामन्यांमध्ये (CSK विरुद्धचा सामना वगळून), ११.३६ च्या खराब इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली आहे आणि केवळ २ विकेट्स घेतल्या आहेत.
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गोलंदाजी करताना मिचेल स्टार्कला काहीशा वेदना होत असल्याचे स्क्रीनवर दिसून आले. गोलंदाजी करताना त्याला त्याच्या बरगड्यांवर ताण जाणवत होता. त्यामुळे त्याला साईड स्ट्रेनचा त्रास होत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्याच्या दुखापतीबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
पण सीएसकेच्या सामन्यात स्टार्कला पाहिल्यनंतर तो फिट आहे, असे वाटत नव्हते. अशा परिस्थितीत तो काही सामन्यांमधून बाहेर राहू शकतो.
मिचेल स्टार्कने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण ३० सामने खेळले आहेत (सीएसकेचा सामना वगळता), ज्यामध्ये त्याने ३६ विकेट घेतल्या आहेत. स्टार्कचा हा तिसरा आयपीएल हंगाम आहे. याआधी तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून आयपीएल २०१५ मध्ये खेळला होता.