मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  NZ vs PAK : न्यूझीलंड-पाकिस्तान टी-20 मालिका अडचणीत? स्टार खेळाडूला कोरोनाची लागण

NZ vs PAK : न्यूझीलंड-पाकिस्तान टी-20 मालिका अडचणीत? स्टार खेळाडूला कोरोनाची लागण

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 12, 2024 11:49 AM IST

Mitchell Santner Corona Positive : न्यूझीलंडचा महत्त्वाचा फिरकी गोलंदाज मिचेल सँटनर याला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही.

Mitchell Santner COVID19 Positive
Mitchell Santner COVID19 Positive (PTI)

Mitchell Santner COVID19 Positive : न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात ५ टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना आज (१२ जानेवारी) ऑकलंड येथे खेळला जाणार आहे. पण हा सामना सुरू होण्यापूर्वी न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे.

न्यूझीलंडचा महत्त्वाचा फिरकी गोलंदाज मिचेल सँटनर याला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. 

T20 विश्वचषक २०२४ ची तयारी लक्षात घेऊन ही मालिका किवी संघासाठी खूप महत्त्वाची मानली जात आहे. या मालिकेत केन विल्यमसनही बऱ्याच काळानंतर खेळताना दिसणार आहे.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने मिचेल सँटनर पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यातून बाहेर असल्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सॅन्टनर पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात सहभागी होण्यासाठी ईडन पार्कला जाणार नाही. त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आगामी काळात वैद्यकीय पथक त्याच्यावर लक्ष ठेवणार आहे.

सॅन्टनर येथून एकटाच त्याच्या हॅमिल्टन येथील घरी जाईल. सँटनर किवी संघाच्या मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये एक महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत ९३ टी-20 सामन्यांत १०३ विकेट्स घेतल्या आहेत आणि बॅटने ६१० धावाही केल्या आहेत.

पाकिस्तानने सामन्यापूर्वी आपली प्लेइंग ११ जाहीर केली

शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या पाकिस्तानी संघाने सामना सुरू होण्यापूर्वीच आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. यामध्ये सैम अयुब मोहम्मद रिझवानसोबत डावाची सुरुवात करेल, तर माजी कर्णधार बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. याशिवाय दोन नवीन खेळाडूंना संघात स्थान मिळाले असून त्यात फिरकी गोलंदाज उसामा मीर आणि वेगवान गोलंदाज अब्बास आफ्रिदी यांना पदार्पणाची संधी मिळाली आहे.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi