मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Mitchell Marsh : दुबळ्या संघाविरुद्धच्या पराभवाने ऑस्ट्रेलियाची सटकली, मिचेल मार्शनं टीम इंडियाला दिली उघड धमकी

Mitchell Marsh : दुबळ्या संघाविरुद्धच्या पराभवाने ऑस्ट्रेलियाची सटकली, मिचेल मार्शनं टीम इंडियाला दिली उघड धमकी

Jun 23, 2024 07:25 PM IST

Mitchell Marsh On Ind vs Aus : अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १४८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ १९.२ षटकांत केवळ १२७ धावांत गडगडला. या पराभवाने हताश झालेल्या ऑस्ट्रेलियन कर्णधाराने सामन्यानंतर भारताला उघड धमकी दिली.

दुबळ्या संघाविरुद्धच्या पराभवाने ऑस्ट्रेलियाची सटकली, मिचेल मार्शनं टीम इंडियाला दिली उघड धमकी
दुबळ्या संघाविरुद्धच्या पराभवाने ऑस्ट्रेलियाची सटकली, मिचेल मार्शनं टीम इंडियाला दिली उघड धमकी (AFP)

Mitchell Marsh Statement After Lost Against Afghanistan : टी-20 वर्ल्ड कप २०२४ मध्ये रविवारी (२३ जून) सर्वात मोठी घटना घडली. सुपर-८ च्या महत्त्वाच्या सामन्यात अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा २१ धावांनी पराभव केला. यानंतर ऑस्ट्रेलियन संघ बिथरला आहे. त्यांचा कर्णधार मिचेल मार्श याने टीम इंडियाला इशारा दिला आहे.

तत्पूर्वी, अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १४८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ १९.२ षटकांत केवळ १२७ धावांत गडगडला. या पराभवाने हताश झालेल्या ऑस्ट्रेलियन कर्णधाराने सामन्यानंतर भारताला उघड धमकी दिली.

ट्रेंडिंग न्यूज

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श म्हणाला की, त्यांचा संघ दबावाखाली सर्वोत्तम कामगिरी करतो आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवातून सावरेल आणि सोमवारी भारताविरुद्धच्या करा किंवा मरो सामन्यात शानदार पुनरागमन करेल.

अफगाणिस्तानकडून पराभूत झाल्याने उपांत्य फेरी गाठण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाला आता भारताविरुद्धच्या सुपर-८ च्या शेवटच्या सामन्यात केवळ विजयाची नोंद करावी लागणार नाही तर नेट रनरेटही चांगला राखावा लागेल.

सामन्यानंतर मिचेल मार्शने पत्रकारांशी बोलताना सांगितले की, "हा एक महत्त्वाचा सामना आहे जो भारताविरुद्ध होणार आहे आणि यामध्ये आम्हाला कोणत्याही किंमतीला विजय मिळवावाच लागेल. आमचा इतिहास पाहिला तर आमचे खेळाडू दबावाखाली सर्वोत्तम कामगिरी करतात. आमचे खेळाडू निश्चितच त्यासाठी पूर्णपणे तयार असतील."

तो पुढे म्हणाला, "आमच्यासाठी आता सर्व गोष्टी स्पष्ट आहेत. आम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. आमच्याकडे खूप चांगले खेळाडू आहेत आणि मला विश्वास आहे की आम्ही सर्वोत्तम संघांविरुद्ध आमची सर्वोत्तम कामगिरी करू. आम्हाला सर्वकाही विसरून पुढे जावे लागेल."

अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाची टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ८ सामन्यांची विजयी मोहीमही संपुष्टात आली आहे. मार्श म्हणाला, आम्हाला या पराभवातून परतावे लागेल. आम्हाला आमच्या खेळाडूंवर प्रचंड विश्वास आहे. आमचा संघ खूप चांगला आहे, पण आजचा दिवस आमचा नव्हता पण सकारात्मक बाब म्हणजे आम्हाला ३६ तासांत पुनरागमन करण्याची संधी मिळत आहे.

WhatsApp channel