Mitchell Marsh Century : मिचेल मार्शनं शतक ठोकून साजरा केला वाढदिवस, पाकिस्तानी गोलंदाजांची केविलवाणी अवस्था
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Mitchell Marsh Century : मिचेल मार्शनं शतक ठोकून साजरा केला वाढदिवस, पाकिस्तानी गोलंदाजांची केविलवाणी अवस्था

Mitchell Marsh Century : मिचेल मार्शनं शतक ठोकून साजरा केला वाढदिवस, पाकिस्तानी गोलंदाजांची केविलवाणी अवस्था

Published Oct 20, 2023 04:28 PM IST

Mitchell Marsh century : क्रिकेट विश्वचषकाचा १८ वा सामना ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जात आहे. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत.

Mitchell Marsh century
Mitchell Marsh century (AFP)

Australia vs Pakistan world cup 2023 : मिचेल मार्शने आपला ३२वा वाढदिवस कायमचा संस्मरणीय बनवला आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध शानदार शतक झळकावले आहे. मार्शने १०० चेंडूत आपले शतक पूर्ण केले. मार्शने ३१व्या षटकातील पाचव्या चेंडूवर मोहम्मद नवाजला चौकार ठोकून आपले शतक पूर्ण केले.

एका चेंडूपूर्वी त्याचा साथीदार डेव्हिड वॉर्नरनेही शतक पूर्ण केले होते. यासह विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रमही दोघांनी नोंदवला गेला. मिचेल मार्श १०१ चेंडूत १२१ धावा करून बाद झाला.

मार्श-वॉर्नरने पहिल्या विकेटसाठी २५९ धावा जोडल्या

मिचेल मार्श शानदार फलंदाजी करत होता, तो ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता, त्यावरून तो आज सहज द्विशतक झळकावेल असे वाटत होते. ३३ षटकांत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या बिनबाद २४५ धावा होती, तेव्हा कर्णधार बाबर आझमने आपले सर्वात मोठे हत्यार शाहीन शाह आफ्रिदीकडे चेंडू सोपवला. हा त्याचा दुसरा स्पेल होता. मिचेल मार्शने या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाचे षटकार ठोकत स्वागत केले. दोन चेंडूंनंतर पुन्हा षटकार मारला. पण पाचव्या चेंडूवर शाहीन आफ्रिदीला चौकार मारण्याच्या नादात तो झेलबाद झाला. त्याचा झेल उसामा मीरने घेतला.

मार्शने १० चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने १०१ चेंडूत १२१ धावा केल्या. वॉर्नर आणि मार्शने पहिल्या विकेटसाठी ३३.५ षटकात २५९ धावांची भागिदारी केली.

बाबरने टॉस जिंकून गोलंदाजी घेतली

तत्पूर्वी, बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, बाबर आझमचा हा निर्णय पूर्णपणे त्याच्या विरोधात गेला. वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी डावाच्या पहिल्या षटकापासून पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली.

पाकिस्तानचा स्ट्राईक गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि हरिस रौफ यांनाही विकेट घेण्यात यश आले नाही. एवढेच नाही तर हारिस रौफने पहिल्या तीन षटकात ४७ धावा दिल्या. केवळ हरिसच नाही तर इतर गोलंदाजांचीही अवस्था दयनीय आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या