मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  MI vs RR : हार्दिकच्या नेतृत्वात मुंबईचा सलग तिसरा पराभव, राजस्थानने केली विजयाची हॅट्ट्रिक, रियान पराग चमकला

MI vs RR : हार्दिकच्या नेतृत्वात मुंबईचा सलग तिसरा पराभव, राजस्थानने केली विजयाची हॅट्ट्रिक, रियान पराग चमकला

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 01, 2024 11:22 PM IST

Mi Vs Rr Cricket Score : आयपीएल २०२४ चा १४ वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात राजस्थानने ६ विकेट्सनी विजय मिळवला.

Mumbai Indians Vs Rajasthan Royals Ipl 2024
Mumbai Indians Vs Rajasthan Royals Ipl 2024 (PTI)

इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये आज राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर ६ गडी राखून विजय मिळवत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आणि सहा गुणांसह गुणतालिकेत पहिले स्थान गाठले. त्याचबरोबर मुंबईला या स्पर्धेत आतापर्यंत एकही विजय मिळवता आलेला नाही. ते दहाव्या स्थानावर आहे.

या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने २० षटकांत ९ गडी गमावून १२५ धावा केल्या आणि राजस्थानसमोर १२६ धावांचे लक्ष्य ठेवले. यानंतर संजूच्या संघाने ६ विकेट्स शिल्लक असताना हे लक्ष्य पूर्ण केले.

मुंबई वि. राजस्थान क्रिकेट स्कोअर

अश्विन बाद

राजस्थानला चौथा धक्का रविचंद्रन अश्विनच्या रूपाने बसला, तो १६ धावा करून बाद झाला. १३व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर आकाश मधवालने तिलक वर्माकरवी त्याला झेलबाद केले. अश्विनने रियान परागसोबत चौथ्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली. १३ षटकांनंतर संघाची धावसंख्या ४ बाद ९४ आहे.

राजस्थानला पहिला धक्का

राजस्थानला पहिला धक्का १० धावांवर बसला. क्वेना माफाकाने पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर यशस्वी जैस्वालला बाद केले. त्याला केवळ १० धावा करता आल्या. संजू सॅमसन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आहे.

मुंबईच्या १२५ धावा

राजस्थान रॉयल्ससमोर मुंबई इंडियन्सचा संघ घरच्या मैदानावर केवळ १२५ धावा करू शकला. राजस्थान रॉयल्सकडून ट्रेंट बोल्ट आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी ३ बळी घेतले. तर नांद्रे बर्गरला दोन विकेट मिळाले. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर मुंबईची सुरुवात खूपच खराब झाली. रोहित शर्मा, नमन धीर आणि डेवाल्ड ब्रेविस शून्यावर बाद झाले.

इशान किशन १६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर हार्दिक पांड्याने २१ चेंडूत ३४ धावा आणि तिलक वर्माने २९  चेंडूत ३२ धावा केल्या, मात्र कर्णधार पंड्या आऊट होताच फलंदाज एक-एका धावेसाठी झगडताना दिसले.

रोहित शर्मा आणि नमन धीरच्या रूपाने पहिल्याच षटकात संघाला २ धक्के बसले. ट्रेंट बोल्टने आपल्या धारदार गोलंदाजीचे प्रदर्शन करत सलग दोन चेंडूत दोन बळी घेतले. डावाच्या तिसऱ्या षटकातही डेव्हॉल्ड ब्रेव्हिसच्या रूपाने डावखुऱ्या गोलंदाजाने तिसरे यश मिळवले. तिन्ही फलंदाज शुन्यावर बाद झाले. संघाला चौथा धक्का २० धावांवर इशान किशनच्या रूपाने बसला. चौथ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर नांद्रे बर्गररच्या गोलंदाजीवर तो सॅमसनकरवी झेलबाद झाला.

या सामन्यात राजस्थानच्या गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांचा धुव्वा उडवला. तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यात पाचव्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी झाली, जी चहलने ७६ धावांच्या स्कोअरवर मोडली. हार्दिकला २१ चेंडूत ३४ धावा करता आल्या. या त्याच्या बॅटमधून ६ चौकार आले. यानंतर सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या पियुष चावलाला केवळ तीन धावा करता आल्या. त्याला आवेश खानने बाद केले.

या सामन्यात मुंबईचा कणा म्हणून उभा राहिलेला तिलक वर्माही यानंतर बाद झाला. युझवेंद्र चहलने त्याला आपला बळी बनवले. २९ चेंडूत ३२ धावा करून वर्मा माघारी परतला. यानंतर गेराल्ड कोएत्झीने ४ आणि टीम डेव्हिडने १७ धावा केल्या. त्याचवेळी बुमराह ८ धावा करून नाबाद राहिला आणि आकाश मधवाल ४ धावा करून नाबाद राहिला. 

राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. नांद्रे बर्गरने दोन, तर आवेश खानने एक गडी बाद केला.

मुंबईचे ७ फलंदाज तंबूत

या सामन्यात मुंबईचा कणा म्हणून उभा राहिलेला तिलक वर्माही बाद झाला. युझवेंद्र चहलने त्याला आपला बळी बनवले. २९ चेंडूत ३२ धावा करून तिलक माघारी परतला. सध्या टीम डेव्हिड आणि गेराल्ड कोएत्झी क्रीजवर आहेत. १४ षटकांनंतर संघाची धावसंख्या ७ बाद ९७ धावा आहे.

  मुंबई इंडियन्सच्या पॉवरप्लेमध्ये ४६ धावा

पॉवरप्लेमध्ये मुंबई इंडियन्सला ४ धक्के बसले. ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात रोहित शर्मा आणि नमन धीरला बाद केले. दोघेही गोल्डन डकवर बाद झाले. यानंतर बोल्टने डावाच्या तिसऱ्या षटकात ब्रेव्हिसलाही बाद केले. त्याचवेळी संघाला चौथा धक्का नांद्रे बर्गरने इशान किशनच्या रूपाने दिला. त्याला केवळ १६ धावा करता आल्या. सध्या हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा क्रीजवर आहेत. सात षटकांनंतर संघाची धावसंख्या ५९/४ आहे.

इशान किशन बाद

राजस्थान रॉयल्सचे गोलंदाज या सामन्यात धुमाकूळ घालताना दिसत आहेत. नांद्रे बर्गरने २९ धावांवर इशान किशनला बाद केले. त्याला या सामन्यात १६ धावा करता आल्या. हार्दिक पंड्या सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.

मुंबईचे तीन फलंदाज तंबूत

ट्रेंट बोल्टने १४ धावांवर मुंबई इंडियन्सला तिसरा धक्का दिला. त्याने आपल्या कोट्यातील दुसऱ्याच षटकात डेव्हॉल्ड ब्रेव्हिसलाही बाद केले. ब्रेव्हिसही गोल्डन डकचा बळी ठरला. तिलक वर्मा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आले आहेत. तीन षटकांनंतर संघाची धावसंख्या १६/३ आहे.

रोहित शर्मा शुन्यावर बाद

मुंबई इंडियन्सची सुरुवात धक्कादायक झाली आहे. रोहित शर्मा आणि नमन धीरला ट्रेंट बोल्टने पहिल्याच लागोपाठ चेंडूवर बाद केले. या सामन्यात दोघेही शुन्यावर पॅव्हेलियनमध्ये परतले. सध्या इशान किशन आणि डेवाल्ड ब्रेविस क्रीजवर आहेत.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, आकाश मधवाल, जसप्रीत बुमराह, क्वेना मफाका.

इम्पॅक्ट सब: डीवाल्ड ब्रेविस, नुवान तुषारा, रोमॅरियो शेफर्ड, नेहल वढेरा, शम्स मुलानी.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल.

इम्पॅक्ट सब : रोवमन पॉवेल, तनुष कोटियन, कुलदीप सेन, शुभम दुबे, अबिद मुश्ताक

राजस्थानने गोलंदाजी घेतली

या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानने संघात एक बदल केला आहे. संदीप शर्मा दुखापतग्रस्त आहे, त्याच्या जागी नांद्रे बर्गर हा सामना खेळणार आहे. तर मुंबई इंडियन्सच्या संघात एकही बदल झालेला नाही.

राजस्थान रॉयल्स शानदार फॉर्मात

संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान विजयी रथावर स्वार आहे. त्यांनी आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये दमदार कामगिरी दाखवली आहे. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सची कामगिरी मात्र, अतिशय निराशाजनक झाली आहे. नवा कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईला दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

मुंबई पहिल्या विजयाच्या शोधात

मुंबई इंडियन्स आयपीएल २०२४ मध्ये अद्याप पहिल्या विजयाच्या शोधात आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्यांच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली. हैदराबादच्या फलंदाजांनी २७७ धावा ठोकल्या होत्या.

पण, मुंबईच्या फलंदाजांची कामगिरी दमदार होती. २७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ २४६ धावा करण्यात यशस्वी ठरला होता.

दोन्ही संभाव्य प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, क्वेना माफाका.

राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रायन पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान, युझवेंद्र चहल.

 

IPL_Entry_Point