MI vs RCB: मुंबई- बंगळुरू आज आमनेसामने; जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड, संभाव्य संघ आणि पीच रिपोर्ट
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  MI vs RCB: मुंबई- बंगळुरू आज आमनेसामने; जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड, संभाव्य संघ आणि पीच रिपोर्ट

MI vs RCB: मुंबई- बंगळुरू आज आमनेसामने; जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड, संभाव्य संघ आणि पीच रिपोर्ट

Apr 11, 2024 08:22 AM IST

MI vs RCB Head-to-Head Record and Probable Playing XI: मुंबई आणि बंगळुरू यांच्यात कोणत्या संघाचे वरचष्मा आहे आणि कोणत्या खेळाडूंना आज प्लेईंग इलेव्हनमध्ये जागा मिळण्याची शक्यता आहे, हे जाणून घेऊ.

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आयपीएल २०२४ मधील २५वा सामना खेळला जाणार आहे.
मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आयपीएल २०२४ मधील २५वा सामना खेळला जाणार आहे.

IPL 2024: आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात फारसा फरक नाही. दोघेही संघर्ष करत आहेत. सलग तीन सामने गमावल्यानंतर अखेर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विजय मिळवला. पण त्यांच्या अडचणी संपलेल्या दिसत नाहीत. दुसरीकडे, आरसीबीचा संघ कोणत्याही फलंदाजाची कामगिरी करत नाही. बंगळुरूचा संघ गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहेत, जे एमआयपेक्षा एक स्थान खाली आहेत. बंगळुरूने चार पैकी तीन सामने गमावले आहेत. तर, फक्त एका सामन्यात विजय मिळवला आहे.

सध्या सुरू असलेल्या आयपीएलचा अर्धा टप्पा जवळ येत असताना कर्णधार फाफ डु प्लेसिस (१०९ धावा), ग्लेन मॅक्सवेल (३२) आणि कॅमेरून ग्रीन (६८) यांच्यासह आरसीबीच्या परदेशी खेळाडूंना फॉर्म मिळवणे आवश्यक आहे. आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या चांगल्या फॉर्मध्ये आहे. त्याने चार सामन्यात ३१६ धावा केल्या आहेत. मात्र, त्याला इतर खेळाडूची साथ मिळाली नाही. अवघ्या पाच महिन्यांपूर्वी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील ५०व्या एकदिवसीय शतकाच्या आठवणी आजही ताज्या असून गुरुवारी याच मैदानावर पुन्हा एकदा खेळण्यासाठी कोहली उत्सुक असेल.

MI vs RCB Live Streaming: आयपीएलमधील सर्वात मोठी लढत; मुंबई आज बंगळुरूशी भिडणार, कधी, कुठे पाहणार सामना?

हेड टू हेड रेकॉर्ड

आयपीएलच्या इतिहासात मुंबई आणि बंगळुरूचा संघ ३४ वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी २० सामन्यात मुंबईच्या संघाने विजय मिळवला आहे. तर, बंगळुरूच्या संघाला १४ सामने जिंकता आले आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ एकूण १० वेळा एकमेकांशी भिडले आहेत. त्यापैकी मुंबईने सात सामने जिंकले आहेत. तर, बंगळुरूच्या संघाला ३ सामन्यात विजय मिळवता आला आहे.

संजूच्या राजस्थान रॉयल्सचा विजयरथ थांबला, गुजरातच्या राशीद खाननं शेवटच्या चेंडूवर विजय खेचून आणला

मुंबईचा संभाव्य संघ:

रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी.

बंगळुरूचा संभाव्य संघ:

विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सौरव चौहान, रीस टोपले, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.

Video : मुंबई-आरसीबी सामना कोण जिंकेल? चक्क रस्त्यावरील श्वानांनी केली भविष्यवाणी, पाहा

खेळपट्टीचा अहवाल

या वेळीही संध्याकाळी साडेसात वाजता सामना सुरू होईल, तेव्हा वेगवान गोलंदाजांना मदत होईल, अशी अपेक्षा आहे, मात्र थोडा वेळ सावधपणे खेळ केला तर फलंदाजही मोठ्या प्रमाणात धावा करू शकतात. कोणता संघ नाणेफेक जिंकेल, ते प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतात, जेणेकरून त्यांच्या वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल अशी अपेक्षा आहे. वेगवान गोलंदाजांनी आतापर्यंत 887 विकेट घेतल्या आहेत, तर स्पिनर्सबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या नावावर 367 विकेट आहेत. येथील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १६९ आहे.

Whats_app_banner
विभाग