MI vs RCB: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघात बदल-mi vs rcb mumbai indians forced to change squad after injury to keeperbatter ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  MI vs RCB: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघात बदल

MI vs RCB: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघात बदल

Apr 11, 2024 05:44 PM IST

Mumbai Indians Change Squad: आरसीबीविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सने आपल्या संघात बदल केला आहे. विकेटकिपर विष्णू विनोदला दुखापत झाल्याने मुंबईच्या संघाने हा निर्णय घेतला आहे.

आयपीएल २०२४: आरसीबीविरुद्ध सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघात बदल करण्यात आला आहे.
आयपीएल २०२४: आरसीबीविरुद्ध सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघात बदल करण्यात आला आहे. (AFP)

IPL 2024: आयपीएल २०२४ मधील २५व्या सामनात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू एकमेकांशी भिडणार आहेत. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज संध्याकाळपासून खेळला जाईल. मात्र, यापूर्वीच मुंबईच्या संघाने आपल्या संघात बदल केला आहे. मुंबईचा विकेटकिपर विष्णू विनोदच्या डाव्या हाताला दुखापत झाल्याने तो आयपीएल २०२४ मधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी सौराष्ट्रचा यष्टीरक्षक-फलंदाज हार्विक देसाईला मुंबई संघात स्थान देण्यात आले आहे.

यष्टीरक्षक फलंदाज विष्णू विनोद हाताला झालेल्या दुखापतीमुळे आयपीएल २०२४ च्या उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला. मुंबई इंडियन्सने सौराष्ट्रचा यष्टीरक्षक फलंदाज हार्विक देसाईला करारबद्ध केले आहे, अशी माहिती बीसीसीआयने गुरुवारी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

२४ वर्षीय हार्विकने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावले आहे. २०१८ मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय अंडर-१९ संघाचा तो सदस्य होता. देसाई यांचा हा पहिलाच आयपीएल दौरा असेल. त्याने सौराष्ट्रकडून २७ टी-२०, ४० लिस्ट ए आणि ४६ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. देसाईचे टी-२० आकडे खूप प्रभावी आहेत. त्याने २७ सामन्यात १३४.१७ च्या स्ट्राईक रेटने ६९१ धावा केल्या आहेत. मात्र, इशान किशन हा मुंबईसंघाचा यष्टीरक्षक-फलंदाज असल्याने त्याला संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे.

नवा कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईला यंदाच्या हंगामात चांगली सुरुवात करता आली नाही. पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या या संघाने स्पर्धेतील पहिले तीन सामने गमावले आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्यांच्या अखेरच्या सामन्यात विजय मिळवला. दुखापतीमुळे पहिल्या तीन सामन्यात खेळू न शकलेल्या सूर्यकुमार यादवच्या पुनरागमनामुळे मुंबईला बळ मिळाले आहे.

संजूच्या राजस्थान रॉयल्सचा विजयरथ थांबला, गुजरातच्या राशीद खाननं शेवटच्या चेंडूवर विजय खेचून आणला

दिल्लीविरुद्ध सामन्यात सूर्यकुमार यादव शून्यावर बाद झाला, पण आरसीबीविरुद्ध सामन्यात तो चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे. कर्णधार हार्दिकलाही फलंदाजीत सातत्यपूर्ण कामगिरी करण्याची गरज आहे. मधल्या षटकांमध्ये त्याचा स्ट्राईक रेट हा मुद्दा ठरला आहे. दिल्लीविरुद्ध त्याने गोलंदाजी केली नसली तरी आरसीबी सामन्यापूर्वी सराव सत्रात तो पूर्ण झुकून गोलंदाजी करताना दिसला.

MI vs RCB Live Streaming: आयपीएलमधील सर्वात मोठी लढत; मुंबई आज बंगळुरूशी भिडणार, कधी, कुठे पाहणार सामना?

आतापर्यंत पाचपैकी चार सामने गमावलेल्या आरसीबीवर पुनरागमनाचा प्रचंड दबाव आहे. त्यांचे परदेशी फलंदाज फ्लॉप ठरले आहेत आणि गोलंदाजांनाही काही खास कामगिरी करता आली नाही. यामुळे त्यांच्यासमोर आता कठीण आव्हान उभे ठाकले आहे.

मुंबईचा संघ:

हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, देवल्ड ब्रेव्हिस, जसप्रीत बुमराह, पीयूष चावला, जेराल्ड कोएत्झी, टिम डेव्हिड, श्रेयस गोपाल, ईशान किशन (यष्टीरक्षक), अंशुल कंबोज, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, क्वेना माफाका, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, नमन धीर, शिवालिक शर्मा, रोमारिओ शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, टिळक वर्मा, हार्विक देसाई, नेहाल वढेरा, ल्यूक वूड.

Whats_app_banner
विभाग