MI vs KKR Head to Head : आज मुंबई-केकेआर सामना रंगणार, कोणता संघ मजबूत? पीच कशी असेल? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  MI vs KKR Head to Head : आज मुंबई-केकेआर सामना रंगणार, कोणता संघ मजबूत? पीच कशी असेल? जाणून घ्या

MI vs KKR Head to Head : आज मुंबई-केकेआर सामना रंगणार, कोणता संघ मजबूत? पीच कशी असेल? जाणून घ्या

May 03, 2024 02:23 PM IST

MI vs KKR Head to Head Record : आयपीएल २०२४ चा ५१ वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.

MI vs KKR Head to Head : आज मुंबई-केकेआर सामना रंगणार, कोणता संघ मजबूत? पीच कशी असेल? जाणून घ्या
MI vs KKR Head to Head : आज मुंबई-केकेआर सामना रंगणार, कोणता संघ मजबूत? पीच कशी असेल? जाणून घ्या

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Pitch Report : आयपीएल २०२४ मध्ये आज (३ मे) एक महत्त्वाचा सामना खेळवला जाणार आहे. मुंबई इंडियन्स कोलकाता नाईट रायडर्सला वानखेडे स्टेडियमवर भिडण्यासाठी सज्ज आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. केकेआर संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे, तर मुंबई संघ नवव्या स्थानावर आहे. 

म्हणजेच दोन्ही संघांना हा सामना जिंकून पुढे जायचे आहे. दरम्यान, आजच्या सामन्यात खेळपट्टी कशी असू शकते आणि दोन्ही संघांची हेड टू हेड आकडेवारी काय आहे हे या सामन्यापूर्वी जाणून घेतले पाहिजे.

मुंबई वि केकेआर हेड टू हेड रेकॉर्ड

मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आजचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. दरम्यान, जर आपण हेड टू हेड आकडेवारीबद्दल बोललो तर दोन्ही संघ आतापर्यंत ३२ वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी मुंबई संघाने २३ सामने जिंकले असून केकेआरने ९ सामने जिंकले आहेत. म्हणजेच मुंबईचा वरचष्मा दिसून येतो.

सामनाही मुंबईत आहे, त्याचा फायदा एमआय संघाला होऊ शकतो. उभय संघांमधील सामन्यातील सर्वात मोठ्या धावसंख्येबद्दल बोलायचे झाल्यास, मुंबई संघाने कोलकाताविरुद्ध २१० धावांची सर्वात मोठी धावसंख्या केली आहे. कोलकाताने मुंबईविरुद्ध २३२ धावांची सर्वोच्च धावसंख्या केली आहे.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमची पीच रिपोर्ट

मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना स्विंग मिळू शकतो. याचा अर्थ वेगवान गोलंदाजांना सुरुवातीच्या काळात थोडी मदत मिळू शकते. मात्र, काही वेळानंतर लहान मैदानामुळे फलंदाजांना भरपूर धावा करण्यास मदत होते. येथील खेळपट्टी सपाट आहे आणि भरपूर धावा केल्या जातात. तसेच बाऊन्स आहे आणि चेंडू बॅटवर चांगला येतो. याचाच अर्थ इथे पुन्हा एकदा मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते.

गुणतालिकेत दोन्ही संघांची स्थिती

आयपीएलच्या गुणतालिकेत सध्या KKR संघ दुसऱ्या स्थानावर आहे. संघाने ९ सामने खेळले आहेत आणि ६ जिंकले आहेत आणि ३ गमावले आहेत.

मुंबईला १० पैकी फक्त ३ सामने जिंकता आले आहेत आणि ७ सामने गमावले आहेत. संघाचे एकूण ६ गुण आहेत.

दोन्ही संभाव्य प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स: इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नेहल वढेरा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह.

कोलकाता नाइट रायडर्स: फिल सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, चेतन साकारिया, वरुण चक्रवर्ती.

Whats_app_banner