आज IPL 2024 च्या २०व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
दिल्ली कॅपिटल्सने संघात दोन बदल केले आहेत. रसिक दार सलामच्या जागी ललित यादवला प्लेईंग-इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे. त्यानंतर दुखापतग्रस्त मिचेल मार्शच्या जागी झाय रिचर्डसन आजचा सामना खेळणार आहे.
तर मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये टीम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, मोहम्मद नबी आणि रोमारिया शेफर्ड हे ४ परदेशी खेळाडू आहेत. सूर्यकुमार यादवचे पुनरागमन झाले आहे.
दिल्ली कॅपिटल्स: डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, झ्ये रिचर्डसन, एनरिक नॉर्खिया, इशांत शर्मा, खलील अहमद.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह.
मुंबई आणि दिल्ली (MI vs DC) यांच्यातील सामना वानखेडे मैदानावर होणार आहे. वानखेडेची खेळपट्टी फलंदाजांसाठी स्वर्ग मानली जाते. चेंडू बॅटवर खूप चांगला येतो आणि शॉट्स मारणे खूप सोपे आहे. वानखेडेची आऊटफिल्डही अतिशय वेगवान आहे. मात्र, गेल्या सामन्यात याच मैदानावर मुंबईचे फलंदाज धावांसाठी धडपडताना दिसले.
वानखेडे मैदानावर आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण ११० सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी ५० सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे, तर ६० सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. म्हणजेच धावांचा पाठलाग करणे हा या मैदानावर सोपे असल्याचे दिसून येते.
मुंबईने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत खूपच निराशाजनक कामगिरी केली आहे. नवा कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईला आतापर्यंत झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याचवेळी दिल्लीची स्थितीही यंदाच्या मोसमात खराबच आहे. ४ सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा स्थितीत दोन्ही संघांना या सामन्यात विजय आवश्यक आहे.
संबंधित बातम्या