मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  रोहित-हार्दिक नाही तर हा खेळाडू तुम्हाला करू शकतो मालामाल! आज ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची टीम

रोहित-हार्दिक नाही तर हा खेळाडू तुम्हाला करू शकतो मालामाल! आज ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची टीम

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 07, 2024 12:11 PM IST

mi vs dc dream 11 prediction : मुंबईने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत खूपच निराशाजनक कामगिरी केली आहे. नवा कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईला आतापर्यंत झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

mi vs dc dream 11 prediction रोहित-हार्दिक नाही तर हा खेळाडू तुम्हाला करू शकतो मालामाल! ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची टीम
mi vs dc dream 11 prediction रोहित-हार्दिक नाही तर हा खेळाडू तुम्हाला करू शकतो मालामाल! ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची टीम

आयपीएल २०२४ मध्ये आज (७ एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.  

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत खूपच निराशाजनक कामगिरी केली आहे. नवा कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईला आतापर्यंत झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याचवेळी दिल्लीची स्थितीही यंदाच्या मोसमात खराबच आहे. ४ सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा स्थितीत दोन्ही संघांना या सामन्यात विजय आवश्यक आहे.

दरम्यान, मुंबई असो की दिल्ली , दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोण असेल सर्वोत्तम यष्टिरक्षक?

यष्टिरक्षक म्हणून तुमच्याकडे दोन चांगले पर्याय आहेत. एक दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत आणि दुसरा इशान किशन. दोघांना संघात ठेवणे महत्त्वाचे फायद्याचे आहे. पंतने मागील दोन सामन्यांमध्ये सलग अर्धशतके झळकावली आहेत. ईशान फॉर्ममध्ये नसला तरी दिल्लीच्या कमकुवत गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध तो मोठी खेळी खेळू शकतो. तर कर्णधारपदासाठी पंत सर्वोत्तम पर्याय असेल.

या फलंदाजांवर दाखवा विश्वास

फलंदाज म्हणून रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ आणि तिलक वर्मा आणि दिल्लीचा ट्रिस्टन स्टब्स हे चांगले पर्याय असतील. तुमच्या चिंतेचा मुद्दा म्हणजे या सामन्यात सूर्यकुमार यादवचे पुनरागमन होऊ शकते. जर सूर्या संघात परतला तर नक्कीच त्याला संघात ठेवणे फायद्याचे ठरेल. 

अष्टपैलू म्हणून हार्दिक पंड्यावर विश्वास दाखवा

तुमच्या ड्रीम इलेव्हन टीममध्ये अष्टपैलू हार्दिक पंड्या हा म्हणून सर्वोत्तम पर्याय असेल. हार्दिक पंड्याने मागील सामन्यात फलंदाजीतून आपली प्रतिभा दाखवली होती. हार्दिक तुम्हाला गोलंदाजीनेही गुण मिळवून देऊ शकतो. 

गोलंदाजीत बुमराहसह या खेळाडूंना निवडा

गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, एनरिक नॉर्खिया आणि आकाश मधवाल हे सर्वोत्तम पर्याय असतील. बूम-बूम बुमराह जवळपास प्रत्येक सामन्यात विकेट घेतो. त्याचवेळी आकाश मढवालची गेल्या सामन्यातील कामगिरीही अप्रतिम होती. जर नॉर्खियाची स्पीड मॅजिक चाचली तर तो तुम्हाला भरपूर पॉइंट्स देऊ शकतो.

मुंबई  इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स ड्रीम इलेव्हन टीम

विकेटकीपर- इशान किशन, ऋषभ पंत (कर्णधार)

फलंदाज - रोहित शर्मा, तिलक वर्मा, पृथ्वी शॉ/सूर्यकुमार यादव, डेव्हिड वॉर्नर, ट्रिस्टन स्टब्स

अष्टपैलू- हार्दिक पंड्या

गोलंदाज- जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आकाश मधवाल, एनरिक नॉर्शिया

IPL_Entry_Point