IPL 2024: आयपीएल २०२४ चा उत्साह शिगेला पोहोचला आहे. लीगमध्ये आतापर्यंत अनेक रोमहर्षक सामने खेळले गेले. मात्र, ज्या सामन्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत, तो सामना आज वानखेडेच्या मैदानावर संध्याकाळी खेळला जाणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने असतील. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने गेल्या दोन सामन्यांमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याचबरोबर केकेआरला हरवून सीएसकेनेही मुंबई गाठली आहे. दरम्यान, मुंबई आणि चेन्नई यांच्यातील लाईव्ह सामना कधी आणि कुठे पाहायचा, जाणून घेऊयात.
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात रविवारी (१४ एप्रिल २०२४) आयपीएलमधील २९वा सामना खेळला जाईल. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, मुंबई आणि चेन्नई यांच्यातील सामना सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजीसह देशातील इतर भाषांमध्ये पाहू शकतो. जिओ सिनेमा ॲपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. याशिवाय, https://marathi.hindustantimes.com/ वर सामन्याशी संबंधित बातम्या, लाइव्ह अपडेट्स आणि रेकॉर्डही वाचू शकता.
इशान किशन (विकेटकिपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, आकाश मधवाल, देवाल्ड ब्रेविस, नमन धीर, नेहल वढेरा, हार्विक देसाई, पियुष चावला, क्वेना मफाका, शम्स मुलानी, ल्यूक वुड, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, शिवालिक शर्मा, नुवान तुषारा, अंशुल कंबोज.
रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिचेल, शिवम दुबे, एमएस धोनी (विकेटकिपर), अजिंक्य रहाणे, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे, महेश थेक्षाना, मोईन अली शेख रशीद, निशांत सिंधू, मिचेल सँटनर, दीपक चहर, मुकेश चौधरी, डेव्हॉन कॉनवे, अजय जाधव मंडल, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंग, आरएस हंगरगेकर, मथीशा पाथीराना, अरावेली अवनीश.
संबंधित बातम्या