MI vs CSK: आयपीएल २०२४ च्या २९ व्या साखळी सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्त्वाखाली चेन्नई सुपरकिंग्जने २० षटकात ४ विकेट्स गमावून मुंबई इंडियन्ससमोर २०६ धावांचे लक्ष्य ठेवले. चेन्नईला या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात धोनीचा सिंहाचा वाटा आहे. त्याने २० व्या षटकातील शेवटच्या चार चेंडूत २० धावा ठोकल्या. या खेळीत त्याने मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर हॅट्ट्रिक षटकार मारले. धोनी व्यतिरिक्त ऋतुराज गायकवाडने चेन्नईकडून ६९ धावांची खेळी केली. तर, शिवम दुबेने नाबाद ६६ धावांची वादळी खेळी केली.
मुंबईविरुद्धच्या या सामन्यात महेंद्रसिंग धोनी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला, तेव्हा चेन्नईच्या डावातील फक्त चार चेंडू शिल्लक होते. धोनीने येताच चेंडू मैदानाबाहेर पोहोचवण्यात सुरुवात केली. धोनीने हार्दिकच्या गोलंदाजीवर षटकारांची हॅट्ट्रिक केली. त्यानंतर चौथ्या चेंडूवर दोन धावा केल्या. अशा पद्धतीने धोनीने चार चेंडूत ५०० च्या स्ट्राईक रेटने २० धावा केल्या.
चेन्नईसाठी धोनीचा हा २५० वा सामना आहे. धोनीने या सामन्यात नाबाद २० धावांची खेळी करत चेन्नईसाठी ५ हजार धावा पूर्ण केल्या. चेन्नईकडून खेळताना ५ हजार धावा करणारा तो पहिला विकेटकिपर ठरला आहे. चेन्नईसाठी ५ हजार किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा तो सुरेश रैनानंतर दुसरा फलंदाज ठरला आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघाने चेन्नईला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबेच्या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईने मुंबईसमोर २०७ धावांचे लक्ष्य ठेवले. मुंबईकडून कर्णधार हार्दिक पांड्याने दोन विकेट घेतल्या. तर, श्रेयस गोपाल आणि जेराल्ड कोएत्झीला प्रत्येक एक-एक विकेट मिळाली.
रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), टिळक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, श्रेयस गोपाल, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, आकाश मधवाल.
रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), टिळक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, श्रेयस गोपाल, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, आकाश मधवाल.