Mumbai Indians IPL Auction : मुंबई इंडियन्सनं तयार केला सर्वात मजबूत संघ, अशी असू शकते प्लेइंग इलेव्हन
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Mumbai Indians IPL Auction : मुंबई इंडियन्सनं तयार केला सर्वात मजबूत संघ, अशी असू शकते प्लेइंग इलेव्हन

Mumbai Indians IPL Auction : मुंबई इंडियन्सनं तयार केला सर्वात मजबूत संघ, अशी असू शकते प्लेइंग इलेव्हन

Nov 26, 2024 10:16 PM IST

Mumbai Indians IPL 2025 Auction : मुंबई इंडियन्सनेही कायम ठेवल्यानंतर मेगा लिलावात करोडो रुपये खर्च केले. मुंबईचा संघ जवळपास तयार झाला आहे. त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नवीन खेळाडूंनाही संधी मिळू शकते.

Mumbai Indians IPL Auction : मुंबई इंडियन्सनं तयार केला सर्वात मजबूत संघ, अशी असू शकते प्लेइंग इलेव्हन
Mumbai Indians IPL Auction : मुंबई इंडियन्सनं तयार केला सर्वात मजबूत संघ, अशी असू शकते प्लेइंग इलेव्हन (Mumbai Indians )

आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने खूप पैसा खर्च केला. संघाने लिलावात ट्रेंट बोल्टच्या रूपाने सर्वात महागडा खेळाडू विकत घेतला. टीमने ट्रेन्ट बोल्टसाठी १२.५० कोटी रुपये मोजले. यानंतर आता मुंबई इंडियन्स हा सर्वात मजबूत संघ तयार झाला आहे.

मुंबई इंडियन्सने दीपक चहर, विल जॅक आणि नमन धीर यांनाही खरेदी केले. प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे झाले तर तेही जवळपास निश्चित झाली आहे.

मेगा लिलावात भारतासोबतच मुंबई इंडियन्सने न्यूझीलंड, अफगाणिस्तान, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेतील खेळाडूंना खरेदी केले. या खेळाडूंना मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही स्थान मिळू  शकते. विल जॅक याला रोहित शर्मासोबत सलामीची संधी मिळू शकते. विल जॅक हा स्फोटक फलंदाजीत तरबेज असून त्याने आयपीएलमध्ये शतकही ठोकले आहे.

मुंबई तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी नमन धीर किंवा तिलक वर्मा यांना संधी देऊ शकते. प्लेइंग इलेव्हनमध्ये सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याचे स्थान निश्चित आहे. रायन रिक्लेटनला यष्टिरक्षक म्हणून प्लेइंग इलेव्हन आणि सलामीवीर म्हणून संधी मिळू शकते. जसप्रीत बुमराहसह वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि मिचेल सँटनरलाही संधी मिळू शकते.

मुंबईने लिलावात ट्रेंट बोल्टच्या रूपाने सर्वात महागडा खेळाडू विकत घेतला. दीपक चहर हा दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला.

मुंबई इंडियन्सचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा, विल जॅक, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रायन रिक्लेटन, मिचेल सँटनर, दीपक चहर, अल्लाह गझनफर, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट.

मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने खरेदी केलेले सर्वात महागडे ५ खेळाडू -

ट्रेंट बोल्ट - न्यूझीलंड - १२.५० कोटी रु

दीपक चहर - भारत - ९.२५ कोटी रु

विल जॅक - इंग्लंड - ५.२५ कोटी रु

नमन धीर - भारत - ५.२५ कोटी रु

अल्लाह गझनफर - अफगाणिस्तान - ४.८० कोटी रुपये

Whats_app_banner