IPL 2024 Fastest Ball Delivery: मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जेराल्ड कोएट्झीला आयपीएल २०२४ मध्ये काही खास कामगिरी करता आली नाही. त्याने आतापर्यंत तीन सामन्यांत केवळ तीन विकेट्स घेतल्या आहेत. परंतु, सोमवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या सामन्यात त्याने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने यंदाच्या आयपीएलमधील सर्वात वेगवान चेंडू टाकल्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवून घेतला आहे. या कामगिरीसह त्याने लखनऊ सुपर जायंट्सचा गोलंदाज मयांक यादवचा विक्रम मोडीत काढला.
लखनौच्या इकाना स्टेडियमवर पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात पदार्पण करणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सचा गोलंदाज मयांकने ताशी १५५.८ किमी वेगाने गोलंदाजी केली. त्यावेळी क्रिजवर उभा असलेला पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनला आश्चर्याचा धक्का बसला. यासह त्याने आयपीएल २०२४ मधील सर्वात वेगवान चेंडू टाकल्याचा मान मिळवला. मात्र, सोमवारी राजस्थानविरुद्ध सामन्यात जेराल्ड कोएट्झी १५७.४ किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला.
१) जेराल्ड कोएट्झी विरुद्ध राजस्थान : (१५७.४) किमी प्रतितास
२) मयंक यादव विरुद्ध पंजाब: (१५५.८) किमी प्रतितास
३) मयंक यादव विरुद्ध पंजाब: (१५३.९) किमी प्रतितास
४) मयंक यादव विरुद्ध पंजाब: (१५३.४) किमी प्रतितास
५) नांद्रे बर्गर विरुद्ध दिल्ली: (१५३) किमी प्रतितास
जेराल्ड कोएट्झीने राजस्थआनविरुद्ध यंदाच्या आयपीएलमधील सर्वात वेगवान चेंडू फेकला. याशिवाय, आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
१) शॉन टेट- १५७.७१ किमी (२०११)
२) जेराल्ड कोएट्झी- १५७.४ किमी (२०२४)
३) लॉकी फर्ग्युसन- १५७. ३ किमी (२०२२)
४) उमरान मलिक- १५७ किमी (२०२२)
५) एनरिच नॉर्टजे- १५६ २२ किमी (२०२०)
मुंबईने गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या मिनी लिलावात कोएट्झीला संघात सामील केले होते. एकदिवसीय विश्वचषकात २० विकेट घेणारा दक्षिण आफ्रिकेचा पहिला गोलंदाज ठरला होता. मात्र, या उजव्या हाताच्या गोलंदाजाला मुंबईकडून तीन सामन्यांत ११.४३ च्या इकॉनॉमी रेटने केवळ तीन विकेट्स घेता आल्या आहेत.