Mayank Yadav : मयंक यादवने डेब्यू सामन्यात केला खास विक्रम, झहीर-बुमराहलादेखील हे जमलं नाही! पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Mayank Yadav : मयंक यादवने डेब्यू सामन्यात केला खास विक्रम, झहीर-बुमराहलादेखील हे जमलं नाही! पाहा

Mayank Yadav : मयंक यादवने डेब्यू सामन्यात केला खास विक्रम, झहीर-बुमराहलादेखील हे जमलं नाही! पाहा

Updated Oct 06, 2024 09:53 PM IST

mayank yadav maiden overs on debut match : मयंकने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलेच षटक मेडन टाकले आहे. पदार्पणाच्या सामन्यात मेडन ओव्हर टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मयंक यादवने एन्ट्री केली आहे.

Mayank Yadav : मयंक यादवने डेब्यू सामन्यात केला खास विक्रम, झहीर-बुमराहलादेखील हे जमलं नाही! पाहा
Mayank Yadav : मयंक यादवने डेब्यू सामन्यात केला खास विक्रम, झहीर-बुमराहलादेखील हे जमलं नाही! पाहा (AP)

Mayank Yadav IND vs BAN : मयंक यादव याने टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना ग्वाल्हेरमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात मयंक यादव आणि नितीश कुमार रेड्डी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यातच मयंक यादवने एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे.

मयंकने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलेच षटक मेडन टाकले आहे. पदार्पणाच्या सामन्यात मेडन ओव्हर टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मयंक यादवने एन्ट्री केली आहे.

विशेष म्हणजे अशी कामगीरी दिग्गज झहीर खान आणि जसप्रीत बुमराहसारखे गोलंदाजही हे करू शकलेले नाहीत. या सामन्यात मयंकनेही एक विकेटही घेतली.

बांगलादेशविरुद्धच्या ग्वाल्हेर टी-20 सामन्यात मयंक यादवने ४ षटके टाकली. यादरम्यान त्याने २१ धावांत १ बळी घेतला. त्याने एक मेडन ओव्हरही टाकला. पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्याच षटकात मेडन षटक टाकणाऱ्या निवडक गोलंदाजांच्या यादीत मयंकचा समावेश झाला आहे.

मयंकपूर्वी अर्शदीप सिंग, नवदीप सैनी, खलील अहमद आणि अजित आगरकर यांनी ही कामगिरी केली आहे. आगरकरने २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात मेडन ओव्हर टाकली होती.

मयंक आयपीएलमुळे प्रसिद्धीझोतात आला

आयपीएलच्या २०२४ च्या हंगामात मयंक प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्याने आपल्या वेगाने सर्वांनाच चकित केले. मयंकने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने १७ लिस्ट ए सामन्यात ३४ विकेट घेतल्या आहेत. १४ टी-20 सामन्यात १९ विकेट घेतल्या आहेत. त्याने प्रथम श्रेणी सामनेही खेळले आहेत. आता मयंकनेही टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे.

बांगलादेशविरुद्ध मयंकसह अर्शदीप-वरूणची दमदार कामगिरी

भारत-बांगलादेश सामन्यात मयंकने एक विकेट घेतली. अर्शदीपने ३ बळी घेतले. त्याने ३.५ षटकात १४ धावा दिल्या आहेत. वरुण चक्रवर्तीने ४ षटकात ३१ धावा देत ३ बळी घेतले. तर वॉशिंग्टन सुंदर आणि हार्दिक पांड्याने १-१ विकेट घेतली. बांगलादेशचा संघ १९.५ षटकात १२७ धावांवर सर्वबाद झाला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या