Matheesha Pathirana : आयपीएल २०२४ सुरू होऊन आठवडा झाला आहे. यानंतर आता या मोसमातील सर्वोत्तम झेल पाहायला मिळाला आहे. चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानाने हा झेल टिपला आहे. पाथिरानाने हा झेल घेतल्यानंतर विकेटकीपर एम एस धोनीदेखील अवाक् झाला होता. धोनीने टाळ्या वाजवून त्याचे कौतुक केले.
आयपीएल २०२४ चा १३ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. या सामन्यात दिल्लीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांनी वेगवान सुरुवात केली आणि ९ षटकात ९३ धावा फटकावल्या.
अशा परिस्थितीत सीएसेकला विकेटची नितांत गरज होती. १० वे षटक मुस्तफिजूर रहमानने टाकले. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्नके, वॉर्नरचा प्रयत्न यशस्वी झाला चेंडू त्याच्या बॅटला चांगला कनेक्ट झाला. पण सर्कलवर थांबलेल्या पाथिरानने चित्त्यासारखी झेप घेत चेंडू पकडला.
पाथीराना हवेत उंच गेला होता, झेल घेतल्यानंतर तो जमिनीवर कोसळला. झेल पूर्ण झाल्यानंतर धोनी आणि सीएसकेच्या खेळाडूंनी त्याचे कौतुक केले. पाथिरानाच्या या झेलने डेव्हिड वॉर्नरची वादळी खेळी संपवली. वॉर्नर ३५ चेंडूंत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५२ धावा करून बाद झाला.

|#+|
आयपीएल २०२४ मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा आजचा हा तिसरा सामना आहे. याआधी झालेल्या दोन्ही सामन्यात चेन्नईने विजय मिळवला आहे. अशा स्थितीत दिल्लीविरुद्धचा सामना जिंकून चेन्नईला विजयाची हॅट्ट्रिक करायला नक्कीच आवडेल. चेन्नईने पहिल्या सामन्यात बेंगळुरूचा ६ गडी राखून तर दुसऱ्या सामन्यात गुजरातचा ६३ धावांनी पराभव केला होता.