Match Fixing In Bangladesh Premier League 2025 : क्रिकेट पुन्हा एकदा मॅच फिक्सिंगने कलंकित झाले आहे. यावेळी बांगलादेश प्रीमियर लीगमधून मॅच फिक्सिंगचे प्रकरण समोर आले आहे. या स्पर्धेतील १० खेळाडू आणि ४ फ्रँचायझींवर फिक्सिंगचा आरोप आहे.
यानंतर आता बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ८ सामन्यांची चौकशी सुरू केली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष फारुख अहमद यांनी शुक्रवारी सांगितले की, कोणताही खेळाडू चुकीच्या व्यवहारात आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
फारुख अहमद यांनी क्रिकबझशी बोलताना सांगितले की, जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत ते याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देऊ शकत नाहीत. कारण त्यांना प्रोटोकॉल पाळावा लागतो. स्पर्धेदरम्यान घडलेल्या सर्व घटनांची नोंद करून नंतर तपास केला जातो. ते पुढे म्हणाले की, तपासात काही निष्पन्न झाले तर शिक्षा खूप कठोर होईल आणि काही निष्पन्न झाले तर त्या व्यक्तीचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल, कारण ते कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाहीच. एकदाच निर्णय घेतला जाईल आणि ते एक उदाहरण बनेल".
डेली स्टारच्या वृत्तानुसार, ज्या १० खेळाडूंची चौकशी सुरू आहे, त्यापैकी ६ बांगलादेशचे राष्ट्रीय खेळाडू असून दोन अनकॅप्ड खेळाडू आणि दोन परदेशी खेळाडू आहेत.
दरबार राजशाही
ढाका कॅपिटल्स
सिल्हेट स्ट्रायकर्स
चितगाव किंग्स
६ जानेवारी: फॉर्च्यून बरीशाल विरुद्ध दरबार राजाशाही
७ जानेवारी: रंगपूर रायडर्स विरुद्ध ढाका कॅपिटल्स
१० जानेवारी: ढाका कॅपिटल्स विरुद्ध सिल्हेट स्ट्रायकर्स
१२ जानेवारी: दरबार राजशाही विरुद्ध ढाका कॅपिटल्स
१३ जानेवारी: चितगाव किंग्स विरुद्ध सिल्हेट स्ट्रायकर्स
२२ जानेवारी: फॉर्च्युन बारीशाल विरुद्ध खुलना टायगर्स
२२ जानेवारी: चितगाव किंग्स विरुद्ध सिल्हेट स्ट्रायकर्स
२३ जानेवारी: दरबार राजाशाही विरुद्ध रंगपूर रायडर्स
बांगलादेश प्रीमियर लीगमधील या सामन्यांमध्ये गोलंदाजांनी सलग तीन वाइड आणि नो-बॉल टाकणे, संशयास्पद प्लेइंग इलेव्हनची निवड करणे आणि मोठे लक्ष्य असतानाही संथ फलंदाजी करणे यासारख्या अनेक संशयास्पद क्रिया आढळल्या आहेत.
संबंधित बातम्या