Mark Wood Bouncer To Azam Khan : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात ४ टी-20 सामन्यांची मालिका खेळली गेली. घरच्या भूमीवर खेळल्या गेलेल्या या मालिकेत इंग्लंडने २-० असा विजय मिळवला. या मालिकेतील २ सामने पावसामुळे वाहून गेले आणि उर्वरित २ सामने इंग्लंडने जिंकले.
मालिकेतील चौथ्या सामन्यात एक अतिशय भितीदायक दृश्य पाहायला मिळाले, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुडचा धारदार बाऊन्सर आझम खानला खेळता आल नाही.
पाकिस्तानचा विकेटकीपर फलंदाज आझम खानने डोळे मिटून वुडच्या धोकादायक बाऊन्सरविरुद्ध फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला विकेट गमवावी लागली. या चेंडूचा व्हिडिओ इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये असे दिसून येतेय की वुडने एक हाय-स्पीड बाउन्सर टाकला आहे, जो आझम खान खेळू शकला नाही. तो चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न करतो. पण चेंडूचा वेग इतका होता की, आझम खान स्वत:ला वाचवू शकेल तोपर्यंत चेंडू त्याच्या हातमोज्यांना लागला.
चेंडू ग्लोव्हजला स्पर्श करून थेट जोस बटलरच्या हातात गेला आणि त्याने झेल घेऊन आझम खानला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. आझम खान ५ चेंडू खेळला आणि खाते न उघडता बाद झाला. वुडने हा चेंडू ११व्या षटकात टाकला. या सामन्यात वुड चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने ४ षटकात ३५ धावा दिल्या आणि २ बळी घेतले.
या सामन्यात आझम खान फलंदाजी शुन्यावर बाद झाला. त्यानंतर तो विकेटकीपर म्हणूनही सपशेल फ्लॉप ठरला. मोहम्मद रिझवान संघात असताना आझम खान किपींग करत आहे. या सामन्यात आझम खानने महत्वाच्या प्रसंग दोन सोपे झेल सोडले. हे झेल आझमने घेतले असते सामन्याचा निकाल कदाचित वेगळा लागला असता.
सामन्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर नेपोटिझमचा आरोप लावण्यात आहे. चाहते पीसीबी आणि बाबर आझमवर प्रचंड संतापलेले आहेत. सोशल मीडियावर आझम खानच्या शरीररावरून त्याची खिल्ली उडवली जात आहे.
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील चौथा टी-२० सामना केनिंग्टन ओव्हल, लंडन येथे खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानचा संघ १९.५ षटकांत १५७ धावांवर आटोपला. उस्मान खानने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली, त्याने २१ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३८ धावा केल्या.
त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने १५.३ षटकांत ३ विकेट्स राखून सहज विजय मिळवला. इंग्लिश संघाकडून सलामी देणाऱ्या फिलिप सॉल्टने सर्वात मोठी खेळी खेळताना २४ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४५ धावा केल्या.