Marcus Stoinis Retirement : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, मार्कस स्टॉइनिसने अचानक घेतली निवृत्ती
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Marcus Stoinis Retirement : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, मार्कस स्टॉइनिसने अचानक घेतली निवृत्ती

Marcus Stoinis Retirement : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, मार्कस स्टॉइनिसने अचानक घेतली निवृत्ती

Published Feb 06, 2025 12:23 PM IST

Marcus Stoinis ODI Retirement : ऑस्ट्रेलियाच्या मार्कस स्टॉइनिस याने अचानक एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सर्वांनाच आश्चर्यचकित केले. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात स्टॉइनिसचा समावेश करण्यात आला होता.

Marcus Stoinis Retirement : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का,  मार्कस स्टॉइनिसने अचानक घेतली निवृत्ती
Marcus Stoinis Retirement : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, मार्कस स्टॉइनिसने अचानक घेतली निवृत्ती (AFP)

ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉइनिस याने वनडे फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी स्टॉइनिसला ऑस्ट्रेलियन संघात स्थान देण्यात आले होते. मात्र त्याने स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. स्टॉइनिस सध्या SA20 मध्ये डर्बन सुपर जायंट्सकडून खेळत आहे.

आता स्टॉइनिस याच्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात दुसऱ्या खेळाडूची एन्ट्री होऊ शकते. सर्व संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात १२ फेब्रुवारीपर्यंत बदल करू शकतात. १९ फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

स्टॉइनिसबद्दल सांगायचे तर, तो २०२३ मध्ये भारतीय भूमीवर खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या विजेत्या संघाचा भाग होता. ऑस्ट्रेलियाकडून व्हाईट बॉल क्रिकेट खेळणारा स्टॉइनिस टी-२० क्रिकेट खेळत राहणार आहे.

यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात खेळवली जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सामने पाकिस्तानमधील तीन शहरे (कराची, रावळपिंडी आणि लाहोर) येथे खेळली जाणार आहेत. पण चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे.

निवृत्ती जाहीर करताना स्टॉइनिस काय म्हणाला?

निवृत्ती जाहीर करताना स्टॉइनिस म्हणाला, ‘ऑस्ट्रेलियासाठी एकदिवसीय क्रिकेट खेळणे हा एक अविश्वसनीय प्रवास होता. या काळात मैदानात घालवलेल्या प्रत्येक क्षणाबद्दल मी कृतज्ञ आहे. माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे ही गोष्ट मला नेहमीच आवडायची. हा एक सोपा निर्णय नव्हता, पण मला विश्वास आहे की माझ्यासाठी एकदिवसीय सामन्यांपासून दूर जाण्याची आणि माझ्या कारकिर्दीच्या पुढील अध्यायावर लक्ष केंद्रित करण्याची हीच योग्य वेळ आहे. माझे रॉन (ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड) यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत आणि मी त्यांच्या पाठिंब्याचे खूप कौतुक करतो.’

मार्कस स्टॉयनीसचे वनडे करिअर

३५ वर्षीय मार्कस स्टॉइनिसने ऑस्ट्रेलियाकडून ७१ एकदिवसीय सामने खेळले. या दरम्यान, त्याने ९३.९६ च्या स्ट्राइक रेटने आणि २६.६९ च्या सरासरीने १४९५ धावा केल्या, ज्यामध्ये एक शतक आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे. स्टॉइनिसने या काळात ४३.१२ च्या सरासरीने ४८ विकेट्स घेतल्या. े

Rohit Bibhishan Jetnavare

eMail

Whats_app_banner

संबंधित बातम्या