मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  गौतम गंभीरला मारायची धमकी ते आता धोनीवर गंभीर आरोप... मनोज तिवारीचे गाजलेले वाद

गौतम गंभीरला मारायची धमकी ते आता धोनीवर गंभीर आरोप... मनोज तिवारीचे गाजलेले वाद

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 20, 2024 04:11 PM IST

Manoj Tiwary : मनोज तिवारीने सोमवारी (१९ फेब्रुवारी) बिहारविरुद्ध विजय मिळवून क्रिकेट करिअरला राम राम केला. मनोज तिवारीच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १० हजांराहून अधिक धावा आहेत.

Cricketer Manoj Tiwary Biggest Controversies
Cricketer Manoj Tiwary Biggest Controversies

Cricketer Manoj Tiwary Biggest Controversies : पश्चिम बंगालचा कर्णधार मनोज तिवारी याने सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मनोज तिवारीने टीम इंडियासाठीदेखील १२ एकदिवसीय सामने खेळले. तसेच, तिवारीने १४८ प्रथम श्रेणी सामने खेळले. ३८ वर्षीय तिवारी सध्या बंगाल सरकारमध्ये क्रीडा मंत्री आहे.

मनोज तिवारीने सोमवारी (१९ फेब्रुवारी) बिहारविरुद्ध विजय मिळवून क्रिकेट करिअरला राम राम केला. मनोज तिवारीच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १० हजांराहून अधिक धावा आहेत. पण तिवारी त्याच्या करिअरदरम्यान अनेकदा अनेक वादाच्या केंद्रस्थानी राहिला आहे.

आता निवृत्ती घेताना त्याने एम एस धोनीवरही गंभीर आरोप केले आहेत. तर पूर्वी त्याने भर मैदानात गौतम गंभीरशीही वाद घातला होता. अशा परिस्थितीत मनोज तिवारी त्याच्या करिअरदरम्यान कोण कोणत्या वादात सापडला होता, याची माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

रणजी ट्रॉफी बंद करण्याची मागणी

मनोज तिवारीने नुकतीच BCCI कडे रणजी ट्रॉफी रद्द करण्याची मागणी केली होती. तिवारीने सोशल मीडिया पोस्ट करत ही मागणी केली होती. यानंतर त्याला मॅच फीच्या २० टक्के दंड करण्यात आला होता. 

तिवारी त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला होता, की युवा खेळाडूंना रणजी ट्रॉफीत रस नाही. त्यांचे सगळे लक्ष आयपीएलकडे आहे. त्यामुळे रणजी क्रिकेट बंद करून टाकावे."

धोनीवर पक्षपाताचा आरोप

आता निवृत्तीनंतर मनोज तिवारीने एका मुलाखतीत सांगितले की, "मला एखाद्या दिवशी धोनीकडून हे जाणून घ्यायला आवडेल, की मी शतक झळकावल्यानंतर आणि सामनावीराचा पुरस्कार जिंकल्यानंतरही सलग काही सामन्यांसाठी बाहेर का बसवले गेले.

२०१२ साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत विराट, रोहित, रैना हे सगळे  धावा काढण्यासाठी धडपडत होते. पण मी शतक केले आणि सामनावीर ठरलो. पण तरी त्यानंतर मला बाहेर बसवले गेले. मला संधी मिळाल्यावर मी धोनीला हे प्रश्न नक्की विचारेन असेही तिवारीने म्हटले आहे. आता माझ्याकडे गमावण्यासारखे काही नाही.

गौतम गंभीरसोबत भांडण

२०१५ मध्ये रणजी सामन्यात बंगालचा कर्णधार मनोज तिवारी आणि दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीर यांच्यात वाद झाला होता. या वाद चांगलाच वाढला होता. दोन्ही खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते. दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमवर कोणत्या तरी मुद्यावरून आमनेसामने आले होते. यानंतर गंभीरने संध्याकाळी मैदानाबाहेर भेट दाखवतो अशी धमकी दिली. तेव्हा फलंदाजी करत असलेल्या तिवारीने संध्याकाळी का आताच चल." असे म्हटले. हे प्रकरण त्यावेळी खूपच चर्चेत आले होते.

IPL_Entry_Point