BCCI ने रणजी ट्रॉफी बंदच करून टाकावी, क्रीडा मंत्र्यांची विचित्र मागणी, काय घडलंय? पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  BCCI ने रणजी ट्रॉफी बंदच करून टाकावी, क्रीडा मंत्र्यांची विचित्र मागणी, काय घडलंय? पाहा

BCCI ने रणजी ट्रॉफी बंदच करून टाकावी, क्रीडा मंत्र्यांची विचित्र मागणी, काय घडलंय? पाहा

Feb 12, 2024 01:41 PM IST

Manoj Tiwari On Ranji Cricket : बंगालचा कर्णधार मनोज तिवारी याने रणजी ट्रॉफी स्पर्धेत अनियमितता असल्याचा आरोप केला आहे. सोबतच पुढील हंगामापासून क्रिकेट कॅलेंडरमधून रणजी ट्रॉफी काढून टाकण्याची मागणी केली आहे.

Manoj Tiwari On Ranji Cricket
Manoj Tiwari On Ranji Cricket (PTI)

भारतात सध्या रणजी ट्रॉफी खेळली जात आहे. या स्पर्धेत दररोज अनेक सामने खेळवले जात आहेत. या सामन्यांदरम्यान टीम इंडियाचा माजी फलंदाज आणि बंगालचा कर्णधार मनोज तिवारी याने रणजी ट्रॉफीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. 

रणजी ट्रॉफीचे महत्व आणि लोकप्रियता लुप्त होत चाललेली आहे. यामुळे निराश आणि संतप्त झालेल्या मनोज तिवारीने बीसीसीआयला पुढच्या हंगामापासून रणजी ट्रॉफी बंद करण्याचा सल्ला दिला आहे. मनोज तिवारी हा सध्या पश्चिम बंगाल सरकारमध्ये क्रीडा मंत्रीदेखील आहे.

मनोज तिवारी नेमकं काय म्हणाला?

बंगालचा कर्णधार मनोज तिवारीने त्याच्या अधिकृत X अकाउंटवर संताप व्यक्त कर लिहिले की, 'पुढील हंगामापासून रणजी ट्रॉफी क्रिकेट कॅलेंडरमधून काढून टाकली पाहिजे. या स्पर्धेत अनेक चुकीच्या गोष्टी घडत आहेत. वैभवशाली इतिहास असलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेला वाचवण्यासाठी अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतील. रणजी ट्रॉफीचे आकर्षण आणि महत्त्व हरवत चालले आहे. याबाबत मी खूप निराश आहे."

दरम्यन, तिवारीने कोणत्या चुकीच्या गोष्टी घडल्या, याचा उल्लेख केला नाही. तिवारी सध्या तिरुअनंतपुरममध्ये आहे. येथे बंगाल आणि केरळ यांच्यात सामना खेळला जात आहे.

मनोज तिवारीचे क्रिकेट करिअर

विशेष म्हणजे, मनोज तिवारीने गेल्या वर्षी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, तथापि, बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या विनंतीमुळे त्याने चालू रणजी हंगामात बंगाल संघाचे नेतृत्व करण्यास सहमती दर्शविली. 

तिवारीने आतापर्यंत १४६ प्रथम श्रेणी सामने खेळले असून त्यात त्याने ३० शतके आणि ४५ अर्धशतके केली आहेत. नाबाद ३०३ धावा ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. अलीकडेच त्याने आसामविरुद्धच्या रणजी सामन्यात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आपल्या १० हजार धावा पूर्ण केल्या. ३८ वर्षीय तिवारी हा देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात अनुभवी आणि यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे.

Whats_app_banner