Yusuf Pathan : क्रिकेटर युसूफ पठाण याला लोकसभेचं तिकीट, TMC कडून या जागेवरून लढवणार निवडणूक
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Yusuf Pathan : क्रिकेटर युसूफ पठाण याला लोकसभेचं तिकीट, TMC कडून या जागेवरून लढवणार निवडणूक

Yusuf Pathan : क्रिकेटर युसूफ पठाण याला लोकसभेचं तिकीट, TMC कडून या जागेवरून लढवणार निवडणूक

Mar 10, 2024 03:11 PM IST

Yusuf Pathan Loksabha Election 2024 TMC : माजी क्रिकेटर युसूफ पठाण याला लोकसभा निवडणुकीचे तिकिट मिळाले आहे. युसूफ तृणमूल कॉंग्रेसच्या तिकिटावर बंगालच्या बहरामपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे.

yusuf pathan loksabha election 2024 : क्रिकेटर युसूफ पठाण याला लोकसभेचे तिकीट, या जागेवरून निवडणूक लढवणार
yusuf pathan loksabha election 2024 : क्रिकेटर युसूफ पठाण याला लोकसभेचे तिकीट, या जागेवरून निवडणूक लढवणार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (TMC) नेत्या ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील ४२ जागांसाठी सर्व उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. ममता यांनी (१० मार्च) कोलकाता येथील ब्रिगेड मैदानावर उमेदवारांची नावे जाहीर केली.

यावेळी ममता बॅनर्जी यांनी सर्वांनाच एक आश्चर्याचा धक्का दिला. ममता यांनी टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण याला निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. युसूफ काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्या बहरामपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

युसूफचं बंगालशी खास नातं

युसूफ पठाण राजकीय पीचवर बॅटिंग करण्यास सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे, युसूफ पठाण आणि बंगालचे नाते खूप जाने आहे. युसूफने आयपीएलमध्ये बराच काळ कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व केले आहे. युसूफ संघात असताना केकेआरने २०१२ आणि २०१४ साली आयपीएल ट्रॉफी जिंकली होती.

युसूफ पठाण हा दोन वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाचा सदस्य आहे. भारताने २००७ मध्ये टी-20 वर्ल्डकप जिंकला होता. त्या वर्ल्डकप फायनलमध्ये युसूफ खेळळा होता. तसेच, त्यानंतर २०११ च्या वर्ल्डकपमध्येही युसूफ पठाण टीम इंडियात होता.

आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक झळकावले

युसूफ पठाण हा भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठा हिटर मानला जातो. आयपीएलच्या पहिल्याच मोसमात युसूफ पठाणने मुंबई इंडियन्सविरुद्ध अवघ्या ३७ चेंडूत शतक झळकावले होते. त्याचा हा विक्रम ४ मोसमात कोणीही मोडू शकले नाही. मात्र त्यानंतर २०१३ मध्ये ख्रिस गेलने अवघ्या ३० चेंडूत शतक झळकावून युसूफचा विक्रम मोडला.

युसुफ पठाणची कारकीर्द

युसूफ पठाणने आपल्या वनडे कारकिर्दीत ४१ एकदिवसीय डावात एकूण ८१० धावा केल्या. या ४१ डावांमध्ये त्याच्या नावावर २ शतके आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे. युसूफ पठाणने भारतासाठी १८ टी-20 डावात एकूण २३६ धावा केल्या. गोलंदाजीत युसूफने एकदिवसीय सामन्यात ३३ आणि टी-20 सामन्यात १३ विकेट्स घेतल्या.

वर्ल्डकप फायनलमधून आंतरराष्ट्रीय पदार्पण

युसूफ पठाणचे टी-20 पदार्पण खूपच खास. वीरेंद्र सेहवाग २००७ टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी जखमी झाला होता. त्याच्या जागी एमएस धोनीने युसूफ पठाणला संधी दिली. धोनीने युसूफ पठाणला सलामीला पाठवले. मात्र, युसूफ पदार्पणाच्या सामन्यात काही खास करू शकला नाही, त्याला ८ चेंडूत केवळ १५ धावा करता आल्या. पण त्याने त्या वर्ल्डकप फायनलमध्ये एक शानदार ठोकला होता. 

Whats_app_banner