मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RCB vs PBKS Dream 11 Prediction : विराट नाही या खेळाडूला बनवा कॅप्टन, आज अशी बनवा तुमची ड्रीम इलेव्हन

RCB vs PBKS Dream 11 Prediction : विराट नाही या खेळाडूला बनवा कॅप्टन, आज अशी बनवा तुमची ड्रीम इलेव्हन

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 25, 2024 12:13 PM IST

RCB vs PBKS IPL 2024 : आयपीएल २०२४ च्या ६व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना पंजाब किंग्जशी होणार आहे. आरसीबीला पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव स्वीकारावा लागला होता. अशा परिस्थितीत संघाला आपल्या घरच्या मैदानावर मोसमातील पहिल्या विजयाची चव चाखायला आवडेल.

RCB vs PBKS Dream 11 Prediction : विराट नाही या खेळाडूला बनवा कॅप्टन, आज अशी बनवा तुमची ड्रीम इलेव्हन
RCB vs PBKS Dream 11 Prediction : विराट नाही या खेळाडूला बनवा कॅप्टन, आज अशी बनवा तुमची ड्रीम इलेव्हन

RCB vs PBKS Dream 11 Team : आयपीएल २०२४ मध्ये आज (२५ मार्च) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघातील हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. बंगळुरूने यंदाचा आपला सामना गमावला आहे. त्यांना सीएसकेने पराभूत केले तर पंजाबने आपल्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला होता.

पंजाब आणि बेंगळुरूचे संघ स्टार खेळाडूंनी भरलेले आहेत, अशा परिस्थितीत ड्रीम-इलेव्हनbj (dream 11 todays match team prediction) संघ बनवण्यासाठी तुम्हाला खूप संघर्ष करावा लागेल. पण येथे आम्ही तुमची समस्या काही प्रमाणात सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत.

जर तुम्हाला आयपीएलदरम्यान फँटसी क्रिकेट खेळण्याची आवड असेल तर तुम्ही आजचा संघ अशा प्रकारे बनवू शकता.

अशी बनवा तुमची टीम

विकेट कीपर म्हणून जितेश शर्मा

यष्टिरक्षक म्हणून तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. पहिला जितेश शर्मा आणि दुसरा अनुज रावत. जितेशचा अलीकडचा फॉर्म आणि गेल्या मोसमातील त्याची कामगिरी लक्षात घेता त्याच्यावर विश्वास दाखवणे अधिक चांगले राहील. तुम्ही अनुजला ग्रँड लीग संघात स्थान देऊ शकता आणि त्याला कर्णधार म्हणूनही आजमावू शकता. मात्र, सुरक्षित खेळायचे असेल, तर जितेश सर्वोत्तम पर्याय आहे.

फलंदाज म्हणून या खेळाडूंना निवडू शकता

फलंदाजीत विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसला निवडू शकता. कारण चिन्नास्वामी मैदानावरील दोघांचा रेकॉर्ड अप्रतिम आहे. यासोबतच गब्बर म्हणजेच शिखर धवन, जॉनी बेअरस्टो तुमच्या टीममध्ये असणे आवश्यक आहे.

अष्टपैलू खेळाडू बंपर पॉइंट देतील

आरसीबी आणि पंजाब यांच्यातील सामन्यात अष्टपैलू खेळाडू तुम्हाला सर्वाधिक गुण मिळवून देऊ शकतात. ग्लेन मॅक्सवेलची संघात निवड करा. लियाम लिव्हिंग्स्टन, सॅम करन आणि कॅमेरॉन ग्रीन तुमचे नशीब रातोरात बदलू शकतात. ग्रीन आणि मॅक्सवेल हे कर्णधार म्हणून उत्तम पर्याय असतील. ग्रीनने गेल्या सामन्यात चांगली गोलंदाजी करत विकेट्स घेतल्या होत्या. तो फलंदाजीतही कमाल करू शकतो.

या गोलंदाजांना संघात स्थान द्या

मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांना तुम्ही गोलंदाज म्हणून संघात समाविष्ट करू शकता. सिराजने या मैदानावर भरपूर क्रिकेट खेळले आहे आणि तो चिन्नास्वामीवर तुम्हाला खूप गुण मिळवून देऊ शकतो. अर्शदीप हा पंजाबचा प्रमुख गोलंदाज आहे.

विकेटकीपर- जितेश शर्मा

फलंदाज - शिखर धवन, विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), जॉनी बेअरस्टो

अष्टपैलू- ग्लेन मॅक्सवेल, लियाम लिव्हिंगस्टन, सॅम करन (उपकर्णधार), कॅमेरून ग्रीन

गोलंदाज - मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग

IPL_Entry_Point