मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  यंदा महाशिवरात्रीला शिवलिंगावर ही फूलं अर्पण करा; महादेव लवकर प्रसत्न होतील, पैशांची कृपा होईल

यंदा महाशिवरात्रीला शिवलिंगावर ही फूलं अर्पण करा; महादेव लवकर प्रसत्न होतील, पैशांची कृपा होईल

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 03, 2024 03:34 PM IST

Mahashivratri 2024 : यंदा महाशिवरात्री ८ मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. महाशिवरात्री जसजशी जवळ येत आहे तसतसे सर्व शिवभक्त महादेवाला प्रसन्न करण्यासाठी विविध तयारीत मग्न आहेत.

Mahashivratri 2024
Mahashivratri 2024

पंचांगानुसार, दरवर्षी माघ वद्य चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा शुभ विवाह झाला होता, अशी धार्मिक मान्यता आहे. तेव्हापासून हा उत्सव महाशिवरात्री या नावाने प्रचलित झाला आणि शिवभक्तांसाठी मोठा उत्सव बनला.

यंदा महाशिवरात्री ८ मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. महाशिवरात्री जसजशी जवळ येत आहे तसतसे सर्व शिवभक्त महादेवाला प्रसन्न करण्यासाठी विविध तयारीत मग्न आहेत.

आज आम्ही तुम्हाला भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी उपासना पद्धतीनुसार एक छोटासा उपाय सांगणार आहोत. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही महादेवाला त्यांचे आवडते फूल अर्पण केले तर ते लवकर प्रसत्न होतील. चला तर मग जाणून घेऊया महाशिवरात्रीला भगवान शंकराला कोणती फुलं अर्पण करावीत.

मोगरा- मोगरा हे फूल त्याच्या सुगंधासाठी ओळखले जाते. हे फुल महादेवाला अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांना संपत्ती आणि समृद्धीचे आशीर्वाद देतात.

बेलाचं फूल- भगवान शंकराच्या पूजेमध्ये बेलाचे पांढरे फूल अर्पण केल्यास प्रत्येक इच्छा लवकर पूर्ण होते. धार्मिक श्रद्धेनुसार, ज्या लोकांना लग्नाशी संबंधित समस्या आहेत त्यांनी हे फुल अर्पण केल्याने त्या समस्या नाहीशा होतात. म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी हे फूल भोलेनाथाला अर्पण करून त्यांचे आशिर्वाद घ्या.

रुई- शिवपुराणात सांगितले आहे की जे लोक भगवान शंकराला रुईचे फुल अर्पण करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो. रुईच्या फुलाला 'मंदार' असेही नाव आहे. अशा स्थितीत या महाशिवरात्रीला भोलेनाथाला पांढऱ्या रुईचे फूल अर्पण करावे. यामुळे तुमची मोक्षाची इच्छा पूर्ण होईल.

जुई- फार कमी लोकांना माहित असेल की जुईचे फूल भगवान शंकराला अर्पण केले जाते. पूजा पद्धतीनुसार जे लोक आर्थिक संकटातून जात आहेत त्यांनी महाशिवरात्रीला हे फूल भगवान शंकराला अर्पण करावे. हे फूल अर्पण केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने घरामध्ये धन-धान्यांचा साठा कायम राहतो.

कण्हेरीचं फूल- महादेवाला कण्हेरीचं फूल खूप आवडते. ते अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद देतात.

चमेली- हे फूल त्याच्या सुगंधासाठी ओळखले जाते. धार्मिक मान्यतेनुसार चमेली फूल महादेवाला अर्पण केल्याने भगवान शंकराचा अद्भूत आशीर्वाद प्राप्त होतो. महाशिवरात्रीला हे फूल भगवान शंकराला अर्पण केल्याने जमीन  आणि वाहनाचे सुख प्राप्त होते.

शमीचे फूल- असे मानले जाते की शिवलिंगावर शमीचे फूल अर्पण केल्याने महादेवाची अपार कृपा होते. अशा स्थितीत महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाची पूजा करताना हे फूल अर्पण करून त्यांचे पुण्य मिळवावे. शनिदोष आणि इतर समस्यांपासून लवकर मुक्ती मिळेल.

 

IPL_Entry_Point