भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने मुंबईत क्रिकेट अकादमी सुरू केली आहे. सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे त्याने रहाणेला मुंबईत क्रिकेट अकादमी उभारण्यासाठी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे आभार मानले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील त्यांना मदत करणाऱ्या लोकांपैकी एक आहेत.
अजिंक्य रहाणेने X वर पोस्ट करत लिहिले, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आशिष शेलार यांचे मनःपूर्वक आभार, ज्यांनी मला मुंबईत क्रिकेट अकादमी सुरू करण्यासाठी मदत केली. ही अकादमी युवा खेळाडूंना उच्चस्तरीय सुविधा आणि प्रशिक्षण देणार आहे. शहरातील नवीन क्रिकेटपटूंची पुढची पिढी तयार करण्यासाठी येथे प्रयत्न केले जातील. तेच ठिकाण जिथून मी माझ्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली."
महाराष्ट्र सरकारने सोमवारी (२३ सप्टेंबर) वांद्रे पूर्व भागातील २ हजार चौरस मीटरचा भूखंड हा रहाणे याला तीस वर्षांकरिता भाडेपट्ट्याने दिला आहे. येथे उच्चस्तरीय क्रीडा अकादमी सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
रहाणेला दिलेला भुखंड हा लिलावती रुग्णालयत आणि पश्चिम द्रुतगती मार्गाजवळ आहे. येथील किंमत प्रती स्वेअरफूट ५० हजार रुपये ते १ लाख रुपयांदरम्यान आहे. अशा स्थितीत जर ५० हजार रुपये प्रति स्वेअर फूटने विचार केला, तरी या भूखंडाची किंमत १० कोटींच्या घरात जाते.
विशेष म्हणजे, हीच जमीन १९९८ मध्ये सुनील गावस्कर यांना इनडोअर क्रिकेट टेस्टिंग सेंटरसाठी भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. पण या जमिनीवर कोणतेही काम न झाल्याने शासनाने ती परत घेतली. सध्या या जमिनीची स्थिती चांगली नाही. झोपडपट्टीत राहणारे लोक त्याचा वापर करत आहेत.
दरम्यान, स्पोर्ट्स अकादमी सुरू करणारा अजिंक्य रहाणे हा पहिला क्रिकेटर नाही. त्याच्या आधी पठाण ब्रदर्स (इरफान पठाण आणि युसूफ पठाण), एमएस धोनी, वीरेंद्र सेहवाग आणि रविचंद्रन अश्विन यांच्यासह अनेक खेळाडूंनी स्वतःच्या क्रिकेट अकादमी उघडल्या आहेत.