कुणी वसीम अक्रम म्हटलं तर कुणी मिचेल जॉन्सन; पण समद फल्लाह याला टीम इंडियातून खेळण्याची संधी मिळालीच नाही!
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  कुणी वसीम अक्रम म्हटलं तर कुणी मिचेल जॉन्सन; पण समद फल्लाह याला टीम इंडियातून खेळण्याची संधी मिळालीच नाही!

कुणी वसीम अक्रम म्हटलं तर कुणी मिचेल जॉन्सन; पण समद फल्लाह याला टीम इंडियातून खेळण्याची संधी मिळालीच नाही!

Published Sep 24, 2024 01:20 PM IST

cricketer samad fallah story : डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली, पण टीम इंडियामध्ये तो कधीही स्थान मिळवू शकला नाही.

कुणी वसीम अक्रम म्हटलं तर कुणी मिचेल जॉन्सन, पण मुंबईचा समद फल्लाह टीम इंडियाकडून खेळू शकला नाही
कुणी वसीम अक्रम म्हटलं तर कुणी मिचेल जॉन्सन, पण मुंबईचा समद फल्लाह टीम इंडियाकडून खेळू शकला नाही

भारताची लोकसंख्या १४० कोटींहून अधिक आहे आणि देशातील बहुसंख्य मुलांना क्रिकेटपटू बनायचे आहे. अशा स्थितीत युवा क्रिकेटपटूंसाठी राष्ट्रीय संघापर्यंत पोहोचण्याचा मार्ग खूप कठीण आहे. बहुतेक खेळाडू गरीबी आणि कठीण परिस्थितीतून संघर्ष करत टीम इंडियात पोहोचतात.

भारतीय क्रिकेट संघापर्यंत पोहोचणे खूप कठीण काम आहे. संघात खेळण्यासाठी तुमच्याकडे प्रतिभेसोबतच चांगले नशीब असणे खूप गरजेचे आहे. बऱ्याच वेळा असे घडते की, प्रतिभा असूनही खेळाडू टीम इंडियापर्यंत पोहोचू शकत नाहीत. अशीच कथा महाराष्ट्रासाठी खेळलेल्या समद फल्लाह याची आहे.

डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली, पण टीम इंडियामध्ये तो कधीही स्थान मिळवू शकला नाही.

समद महाराष्ट्राकडून अनेक वर्षे देशांतर्गत क्रिकेट खेळला. तो उत्तराखंडकडूनही क्रिकेट खेळला. २०१० मध्ये, समदने महाराष्ट्राला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. अंतिम सामन्यात त्याने ४ बळी घेतले होते.

हळूहळू समद त्याच्या गोलंदाजीमुळे प्रसिद्धीझोतात येऊ लागला आणि त्याला भारताचा वसीम अक्रम आणि मिचेल जॉन्सन म्हटले जाऊ लागले. त्यानंतर लवकरच समदला टीम इंडियात स्थान मिळेल असे वाटत होते, पण तसे होऊ शकले नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने चांगली कामगिरी केली. पण तो टीम इंडियापर्यंत पोहोचू शकला नाही.

रणजीपूर्वी एज ग्रुप क्रिकेट खेळले नव्हते

समद फल्लाह याने २००७ मध्ये महाराष्ट्रासाठी रणजी पदार्पण केले होते. रणजी संघात येण्यापूर्वी समदने वयोगटातील कोणतेही क्रिकेट खेळले नव्हते. याआधी तो टेनिस बॉल क्रिकेट खेळायचा. पदार्पणाच्या वेळी समद केवळ २२ वर्षांचा होता. पदार्पणाच्या सामन्यातच ६ विकेट घेत त्याने आश्चर्यकारक कामगिरी केली.

समद त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या दिवसांत उत्तराखंडकडून खेळला. त्यानंतर त्याला पुन्हा महाराष्ट्र क्रिकेटमध्ये परतायचे होते, पण संधी मिळाली नाही. २०२०-२१ हंगामात तो उत्तराखंडकडून खेळला. त्यानंतर तो पुनरागमन करू शकला नाही आणि जवळपास तीन वर्षे संधी न मिळाल्याने त्याने जून २०२४ मध्ये निवृत्ती जाहीर केली.

समद फल्लाह याचे क्रिकेट करिअर

समदने आपल्या कारकिर्दीत ७८ प्रथम श्रेणी, ५० लिस्ट ए आणि ५८ टी-20 सामने खेळले. त्याने १३८ प्रथम श्रेणी डावात २८७ विकेट घेतल्या. याशिवाय त्याने लिस्ट ए च्या ५० डावात ७५ आणि टी20 च्या ५७ डावात ६२ विकेट्स घेतल्या आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या