मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ranji Trophy 2024 : कुलवंत खेलजोरियानं रचला इतिहास, रणजी सामन्यात घेतले ४ चेंडूत ४ विकेट, व्हिडीओ पाहा

Ranji Trophy 2024 : कुलवंत खेलजोरियानं रचला इतिहास, रणजी सामन्यात घेतले ४ चेंडूत ४ विकेट, व्हिडीओ पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 13, 2024 10:59 AM IST

Kulwant Khejroliya 4 Wicket in 4 Ball : मध्य प्रदेशचा वेगवान गोलंदाज कुलवंत खेलजोरियाने ४ चेंडूत ४ विकेट घेतल्या आहे. डी गटातील बडोद्याविरुद्धच्या सामन्यात त्याने हा चमत्कार केला आहे.

Kulwant Khejroliya 4 Wicket in 4 Ball
Kulwant Khejroliya 4 Wicket in 4 Ball

MP vs BRODA, Ranji Trophy 2023/24 : भारतात सध्या रणजी ट्रॉफीचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत ग्रुप डी मध्ये मध्य प्रदेश आणि बडोदा यांच्यात सामना झाला. या सामन्यात मध्य प्रदेशचा डावखुरा वेगवान गोलंदाज कुलवंत खेजरोलिया याने जबरदस्त गोलंदाजी केली. खेलजोरियाने सलग चार चेंडूत ४ विकेट घेतल्या.

खेलजोरियाच्या धारदार गोलंदाजीच्या बळावर मध्य प्रदेशने बडोद्याचा एक डाव आणि ५२ धावांनी पराभव केला. हा सामना इंदोरमध्ये खेळला गेला.

यानंतर आता कुलवंत खेलजोरिया हा ४ चेंडूत ४ विकेट घेणारा रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील तिसरा गोलंदाज ठरला आहे. मध्य प्रदेशने बडोद्याला ९८.३ षटकांत २७० धावांत गुंडाळून मोठा विजय नोंदवला आणि गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

खेजरोलियाने पहिल्या डावात २ बळी घेतले होते. यासह त्याने संपूर्ण सामन्यात ७ विकेट घेतल्या.

रणजीमध्ये सलग ४ विकेट घेणारे गोलंदाज

शंकर सैनी- दिल्ली वि. हिमाचल प्रदेश, १९८८

मोहम्मद मुधासीर- जम्मू काश्मीर वि. राजस्थान, २०१८

कुलवंत खेजरोलिया- मध्य प्रदेश वि. बडोदा, २०२४

कुलवंत खेजरोलिया याच्या चमकदार कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. खेजरोलिया आयपीएलही खेळला आहे. तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाइट रायडर्सच्या संघात होता. २०१८ मध्ये त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून कुलवंतने आयपीएलमध्ये ७ सामने खेळले असून त्यात त्याने ५. विकेट घेतल्या आहेत.

WhatsApp channel