LSG Vs GT Match Highlights : लखनौच्या यश ठाकूरचा पंजा, गुजरातला २० षटकंही खेळता आली नाहीत,
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  LSG Vs GT Match Highlights : लखनौच्या यश ठाकूरचा पंजा, गुजरातला २० षटकंही खेळता आली नाहीत,

LSG Vs GT Match Highlights : लखनौच्या यश ठाकूरचा पंजा, गुजरातला २० षटकंही खेळता आली नाहीत,

Published Apr 07, 2024 11:26 PM IST

IPL 2024 LSG Vs GT Highlights : आयपीएल २०२४ मध्ये रविवारी (७ एप्रिल) लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात सामना झाला. या सामन्यात केएल राहुलच्या नेतृत्वाखाली लखनौने धमाकेदार विजय मिळवला.

Lucknow Super Giants won by 33 runs
Lucknow Super Giants won by 33 runs (PTI)

IPL 2024 LSG Vs GT Match Highlights : लखनौ सुपर जायंट्ससाठी आजचा (७ एप्रिल) दिवस हा खूप खास होता. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्सने गुजरात टायटन्सचा एकतर्फी पराभव केला. लखनौच्या एकना स्टेडियमवर लखनौने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १६३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ १९.५ षटकात १३० धावात गारद झाला.

या विजयासह लखनौ संघ ६ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे, तर गुजरात टायटन्स ५ सामन्यांत २ विजय आणि तीन पराभवांसह ४ गुण मिळवून सातव्या स्थानावर आहे.

विशेष म्हणजे, आयपीएलच्या इतिहासात लखनौचा गुजरातविरुद्धचा हा पहिलाच विजय आहे. वास्तविक, गुजरात आणि लखनौ हे दोन्ही आयपीएलचे नवीन संघ आहेत आणि दोघांनी २०२२ च्या हंगामात दोन्ही संघांनी आयपीएलमध्ये एन्ट्री केली होती. या दोन्ही संघांचा हा तिसरा सीझन आहे. आता लखनौने दोन सीझनंतर गुजरातचा पराभव करण्यात यश मिळवले आहे.

या सामन्यापूर्वी गुजरात आणि लखनौ यांच्यात आयपीएलमध्ये एकूण ४ सामने खेळले गेले होते आणि प्रत्येक वेळी गुजरातने विजय मिळवला होता. म्हणजेच या सामन्यापर्यंत लखनौचा संघ गुजरातविरुद्ध विजयाचे खाते उघडू शकला नव्हता. 

तत्पूर्वी, या सामन्यात लखनौ संघाने १६४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. याला प्रत्युत्तर म्हणून गुजरातचा संघ १८.५ षटकांत १३० धावांवर गारद झाला. 

या सामन्यात साई सुदर्शनने गुजरातसाठी सर्वाधिक ३१ धावांची खेळी केली. तर राहुल तेवतियाने ३० आणि शुभमन गिलने १९ धावा केल्या.

वेगवान गोलंदाज यश ठाकूर आणि फिरकीपटू कृणाल पंड्या यांनी लखनौ संघासाठी शानदार गोलंदाजी केली. यशने ३० धावा आणि ५ विकेट घेतल्या. तर कृणालने ११ धावांत ३ बळी घेतले. तर नवीन उल हक आणि रवी बिश्नोई यांनी १-१ बळी मिळवले.

लखनौचा डाव

लखनौने प्रथम टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना १६३ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून मार्कस स्टॉइनिसने अर्धशतक झळकावले. त्याने ४३ चेंडूंचा सामना करत ५८ धावा केल्या. स्टॉइनिसच्या या खेळीत ४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. निकोलस पुरनने नाबाद ३२  धावा केल्या. आयुष बदोनी २० धावा करून बाद झाला. केएल राहुलने ३३ धावांचे योगदान दिले. अशाप्रकारे लखनौने २० षटकांत ५ गडी गमावून १६३ धावा केल्या.

गुजरातकडून उमेश यादवने चांगली गोलंदाजी केली. त्याने ३ षटकात २२ धावा देत २ बळी घेतले. दर्शनलाही २ बळी मिळाले. राशिद खानने १ बळी घेतला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या