KL Rahul IPL 2025 : लखनौ सुपर जायंट्सचा नवा कर्णधार कोण? ही दोन नावं चर्चेत, केएल राहुलचा पत्ता कटणार?-lucknow super giants may not retain kl rahul in ipl 2025 lsg searching new captain according to reports ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  KL Rahul IPL 2025 : लखनौ सुपर जायंट्सचा नवा कर्णधार कोण? ही दोन नावं चर्चेत, केएल राहुलचा पत्ता कटणार?

KL Rahul IPL 2025 : लखनौ सुपर जायंट्सचा नवा कर्णधार कोण? ही दोन नावं चर्चेत, केएल राहुलचा पत्ता कटणार?

Aug 27, 2024 03:27 PM IST

KL Rahul has not yet received assurance from LSG, with IPL yet to reveal the rules of retention for the upcoming auction ahead of 2025 edition of the league.

KL Rahul IPL 2025 : लखनौ सुपर जायंट्सचा नवा कर्णधार कोण? ही दोन नावं चर्चेत, केएल राहुलचा पत्ता कटणार?
KL Rahul IPL 2025 : लखनौ सुपर जायंट्सचा नवा कर्णधार कोण? ही दोन नावं चर्चेत, केएल राहुलचा पत्ता कटणार? (X)

लखनऊ सुपर जायंट्सच्या संघात आयपीएल २०२५ पूर्वी एक मोठे बदल होऊ शकतो. लखनौचा कर्णधार बदलला जाऊ शकतो. अलीकडेच संघाचे मालक संजीव गोएंका यांनी केएल राहुल यांची भेट घेतली. राहुलबद्दल अनेक अफवा आहेत. मात्र अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही.

एका वृत्तानुसार, लखनऊल सुपर जायंट्स राहुलला रिटेन करण्याच्या मनस्थितीत नाही. राहुलला रीलीज केल्यास संघाला नव्या कर्णधाराचा शोध घ्यावा लागेल.

संजीव गोएंका आणि राहुल यांची रविवारी (२५ ऑगस्ट) रात्री बंगळुरूमध्ये भेट झाली. ही बैठक सुमारे तासभर चालली. IPL २०२४ मधील एका सामन्यात झालेल्या पराभवानंतर गोयंका आणि राहुल यांच्यात वादही झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली होती. या प्रकरणानंतरच राहुल संघ सोडणार असल्याची चर्चा होती.

मेगा लिलावात लखनऊ कर्णधाराचा शोध घेऊ शकते

लखनऊने राहुलला कर्णधारपदावरून हटवल्यास प्रथम मेगा लिलावावर लक्ष केंद्रित केले जाईल. संघाला मोठ्या खेळाडूंवर बाजी मारायला आवडेल. रोहित शर्मा सध्या चर्चेत आहे. जर तो मुंबई इंडियन्समधून बाहेर पडला तर तो मेगा ऑक्शनमध्ये मोठी कमाई करेल. लखनऊचा संघही रोहितवर बोली लावू शकतो. यासोबतच जर सूर्यकुमार यादवही लिलावात आला तर तो संघाच्या नजरेत असेल.

कर्णधारपदाच्या शर्यतीत कृणाल-निकोलस पुरन पुढे

जर संघाने राहुलला हटवले तर कृणाल पंड्या किंवा निकोलस पूरन हे कर्णधाक म्हणून चांगले पर्याय असू शकतात. या दोघांकडे कर्णधारपदाचा अनुभव कमी आहे. पण त्यांना खेळाडू म्हणून खूप अनुभव आहे. कृणालने आतापर्यंत आयपीएलमध्ये १२७ सामने खेळले आहेत. या कालावधीत १६४७ धावा केल्या आहेत. त्याने लीगमध्ये ७६ विकेट्सही घेतल्या आहेत. तर निकोलस पुरनबद्दल बोलायचे झाले तर तो आयपीएलचे ७६ सामने खेळला आहे. या कालावधीत त्याने १७६९ धावा केल्या आहेत.