LSG vs PBKS Dream 11 Prediction : ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची प्लेइंग इलेव्हन, आज या ११ खेळाडूंवर ठेवा विश्वास
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  LSG vs PBKS Dream 11 Prediction : ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची प्लेइंग इलेव्हन, आज या ११ खेळाडूंवर ठेवा विश्वास

LSG vs PBKS Dream 11 Prediction : ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची प्लेइंग इलेव्हन, आज या ११ खेळाडूंवर ठेवा विश्वास

Mar 30, 2024 11:21 AM IST

LSG vs PBKS IPL 2024 : आयपीएल २०२४ मध्ये आज लखनौ आणि पंजाब आमनेसामने येणार आहेत. हा सामना लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर सायंकाळी ७:३० वाजेपासून खेळला जाईल.

LSG vs PBKS Dream 11 Prediction : ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची प्लेइंग इलेव्हन
LSG vs PBKS Dream 11 Prediction : ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची प्लेइंग इलेव्हन

lsg vs pbks dream 11 prediction : आयपीएल २०२४ मध्ये आज (३० मार्च) केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्स आणि शिखर धवनची पंजाब किंग्ज आमनेसामने येणार आहे. दोन्ही संघांमधील 

पंजाबचा हा तिसरा सामना असेल, त्यांनी त्यांच्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केले होते. तर दुसऱ्या सामन्यात त्यांचा आरसीबीकडून पराभव झाला. ते गुणतालिकेत ५व्या क्रमांकावर आहेत. तर लखनऊ सुपर जायंट्स पॉइंट टेबलमध्ये तळाच्या म्हणजे दहाव्या स्थानावर आहे. लखनौ सुपर जायंट्सला राजस्थान रॉयल्सविरुद्ध २० धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

लखनौ असो की आरसीबी , दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match taam prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल. पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कर्णधार आणि उपकर्णधार कोणाला बनवणार?

केएल राहुल : केएल राहुल या वर्षी सर्व फॉरमॅटमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि त्याने गेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावले होते. सोबतच तो त्याच्या यष्टीरक्षण कौशल्याने अतिरिक्त गुण मिळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तुम्ही त्याला तुमच्या ड्रीम-इलेव्हन संघाचा कर्णधार बनवू शकता.

ड्रीम इलेव्हन (PBKS VS LSG Dream 11 )

सॅम करन: सॅम करन बॅट आणि बॉल दोन्हीने प्रभावित करू शकतो. तो उपकर्णधार पदासाठी योग्य पर्याय असेल.

विकेटकीपर: केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन, जितेश शर्मा

फलंदाज: शिखर धवन, देवदत्त पडिक्कल

अष्टपैलू: सॅम करन (उपकर्णधार), हरप्रीत ब्रार

गोलंदाज: कागिसो रबाडा, मोहसीन खान, रवी बिश्नोई.

 

Whats_app_banner