LSG Vs GT Highlights : लखनौने केली विजयाची हॅट्ट्रिक, गुजरातचा ३३ धावांनी पराभव, यश ठाकूरचे ५ विकेट
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  LSG Vs GT Highlights : लखनौने केली विजयाची हॅट्ट्रिक, गुजरातचा ३३ धावांनी पराभव, यश ठाकूरचे ५ विकेट

LSG Vs GT Highlights : लखनौने केली विजयाची हॅट्ट्रिक, गुजरातचा ३३ धावांनी पराभव, यश ठाकूरचे ५ विकेट

Published Apr 07, 2024 07:02 PM IST

LSG Vs GT IPL Scorecard : आयपीएल २०२४ च्या २१व्या सामन्यात लखनौ सुपरजायंट्सचा सामना गुजरात टायटन्सशी झाला. दोन्ही संघांमधील हा सामना लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात लखनौने शानदार विजय मिळवला.

LSG Vs GT IPL Scorecard
LSG Vs GT IPL Scorecard

इंडियन प्रीमियर लीगचा २१ वा सामना गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. लखनौच्या एकना स्टेडियमवर लखनौने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि १६३ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ १३० धावात गारद झाला.

लखनौकडून यश ठाकूरने शानदार गोलंदाजी करत ३० धावांत ५ बळी घेतले. लखनौसाठी मार्कस स्टॉइनिसने शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. त्याने ५८ धावा केल्या. निकोलस पुरनने नाबाद ३२ धावा केल्या. आयुष बदोनीने २० धावांचे योगदान दिले. गुजरातकडून गोलंदाजी करताना दर्शन नळकांडे आणि उमेश यादवने २-२ बळी घेतले.

१६४ धावांचा पाठालाग करताना गुजरातकडून राहुल तेवतियाने ३० धावा केल्या. साई सुदर्शनने ३१ धावा केल्या. विजय शंकरने १७ धावांची खेळी केली. यादरम्यान लखनौकडून यशने गोलंदाजी करताना ५ बळी घेतले. कृणाल पांड्याने ३ बळी घेतले. रवी बिश्नोई आणि नवीन यांना १-१ विकेट मिळाली.

लखनौ वि. गुजरात क्रिकेट स्कोअर

गुजरातचा डाव गडगडला

नवोदित शरथ बीआरला बाद करून कृणाल पांड्याने गुजरात टायटन्सला आणखी एक धक्का दिला आहे. चांगल्या सुरुवातीनंतर गुजरातचा डाव गडगडला आहे. त्यांचे अवघ्या ७ धावांत ४ विकेट पडल्या आहेत. क्रुणालने या सामन्यातील आपली दुसरी विकेट घेतली. सध्या दर्शन नळकांडे विजय शंकरसोबत क्रीजवर उपस्थित आहे. विल्यमसन, सुदर्शन, गिल तंबूत परतले आहेत.

शुभमन गिल बाद

गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल बाद झाला आहे. यश ठाकूरने लखनौ सुपरजायंट्सला पहिले यश मिळवून दिले. यशने गिलला बोल्ड केले. गिल २१ चेंडूत १९ धावा करून बाद झाला. पॉवरप्ले संपेपर्यंत गुजरातने एका विकेटवर ५४ धावा केल्या होत्या. गिल आणि सुदर्शन यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली होती जी यशने तोडली.

लखनौ सुपरजायंट्सच्या १६३ धावा

लखनौ सुपरजायंट्सने २० षटकांत ५ बाद १६३ धावा केल्या आहेत. संघाने पहिला विकेट क्विंटन डी कॉकच्या रुपात (६) अवघ्या 6 धावांवर पहिल्याच षटकात गमावला. यानंतर देवदत्त पडिक्कलच्या (७) रूपाने त्याची दुसरी विकेटही १८ धावांवर पडली. मात्र कर्णधार केएल राहुलने ३३ आणि मार्कस स्टॉइनिसने ५८ धावा करत संघाचा डाव सावरला.

अखेरीस, आयुष बडोनीने ११ चेंडूत २० धावा आणि निकोलस पुरनने २२ चेंडूत ३२ धावा करत संघाला या मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. 

दुसरीकडे, गुजरात टायटन्सकडून उमेश यादव आणि दर्शन नळकांडे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. फिरकीपटू राशिद खानला एक विकेट मिळाली.

अर्धशतकानंतर स्टोईनीस बाद

दर्शन नळकांडेने मार्कस स्टॉइनिसची शानदार खेळी संपुष्टात आणली. अर्धशतक झळकावल्यानंतर स्टॉइनिसने आपली विकेट गमावली आहे. नळकांडेने स्टॉइनिसला झेलबाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. स्टॉइनिस ४३ चेंडूत ५८ धावा करून बाद झाला. या सामन्यातील नळकांडेची ही दुसरी विकेट आहे. १५ षटके संपल्यानंतर लखनौने ४ गड्यांच्या मोबदल्यात ११४ धावा केल्या आहेत. सध्या निकोलस पुरन ४ चेंडूत ४ धावा करून क्रीझवर असून आयुष बडोनीने एका चेंडूवर दोन धावा केल्या आहेत.

केएल राहुल बाद

दर्शन नळकांडेने गुजरात टायटन्सला तिसरी विकेट मिळवून दिली. लखनौचा कर्णधार केएल राहुल बाद झाला आहे. नळकांडेने राहुलला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. राहुल ३१  चेंडूत ३३ धावा करून बाद झाला. मार्कस स्टॉइनिस ३४ चेंडूत ४१ धावा करून क्रीजवर आहे. त्याला साथ देण्यासाठी निकोलस पुरन नवा फलंदाज म्हणून आला आहे.

राहुल-स्टोईनीसची शानदार फलंदाजी

सुरुवातीच्या धक्क्यानंतर कर्णधार केएल राहुल आणि मार्कस स्टॉइनिस क्रीजवर आहेत. या दोन फलंदाजांच्या संयमी खेळीमुळे लखनौने १० षटक संपल्यानंतर२ बाद ७४ धावा केल्या आहेत. सध्या केएल राहुल २५ चेंडूत २८ धावा आणि स्टॉइनिस २४ चेंडूत २९ धावा करून क्रीझवर आहे.

केएल राहुल आणि स्टॉइनिसने डाव सावरला

कर्णधार केएल राहुल आणि मार्कस स्टॉइनिसने लखनौचा डाव सावरला आहे. त्याआधी गुजरातचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने दोन फलंदाजांची शिकार केली होती. पॉवरप्ले संपल्यानंतर लखनौने दोन गड्यांच्या मोबदल्यात ४७ धावा केल्या आहेत. सध्या राहुल १३ चेंडूत १४ धावा करून क्रीजवर आहे तर स्टोइनिसने १२ चेंडूत १६ धावा केल्या आहेत.

क्विंटन डी कॉक पहिल्याच षटकात बाद

गुजरात टायटन्सने लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध शानदार सुरुवात केली आहे. वेगवान गोलंदाज उमेश यादवने पहिल्याच षटकात लखनौला धक्का दिला आहे. त्याने डी कॉकला बाद केले. ४ चेंडूत ६ धावा करून डी कॉक बाद झाला. कर्णधार केएल राहुल देवदत्त पडिक्कलसोबत क्रीजवर उपस्थित आहे.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), देवदत्त पडिककल, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, यश ठाकूर, नवीन-उल-हक, मयंक यादव.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (कर्णधार), शरथ बीआर (विकेटकीपर), साई सुदर्शन, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन, दर्शन नळकांडे, मोहित शर्मा.

लखनौने टॉस जिंकला

लखनौ सुपरजायंट्सचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी लखनौ संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

तर गुजरातने या सामन्यासाठी संघात काही बदल केले आहेत. या सामन्यासाठी संघाचा यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा उपलब्ध नाही. त्याच्याऐवजी बी आर शरथ आयपीएल पदार्पण करत आहे. तर अजमतुल्लाह ओमरझाई ऐवजी स्पेन्सर जॉन्सन संघात परतला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या