इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये २६ वा सामना आज (१२ एप्रिल) लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर २० षटकात ७ बाद १६७ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीने १८.१ षटकात १७० धावा करत सामना जिंकला.
दिल्लीचा हा या मोसमातील आपला दुसरा विजय आहे.
दिल्लीने १६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली होती. डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांच्यात पहिल्या विकेटसाठी २४ धावांची भागीदारी झाली, जी यश ठाकूरने मोडली. चौथ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने वॉर्नरला (८) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तर शॉने ४ चौकारांच्या मदतीने ३२ धावा केल्या.
यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जॅक फ्रेझर मॅकगर्क आणि ऋषभ पंत यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी केली जी नवीन-उल-हकने मोडली. त्याने या सामन्यात पदार्पण करणाऱ्या मॅकगर्कला १४० धावांच्या स्कोअरवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
मॅकगर्कने लखनौविरुद्ध ३१ चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याचवेळी पंत ४१ धावा करून बाद झाला. यानंतर ट्रिस्टन स्टब्स (१५) आणि शाई होप (११) यांच्यात पाचव्या विकेटसाठी २४ धावांची नाबाद भागीदारी झाली. लखनौतर्फे रवी बिश्नोईने दोन तर नवीन-उल-हक आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
फिरकीपटू रवी बिश्नोईने सलामीवीर पृथ्वी शॉला बाद करून दिल्ली कॅपिटल्सला दुसरा धक्का दिला. २२ चेंडूत ३२ धावा करून पृथ्वी बाद झाला. पृथ्वी पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर कर्णधार ऋषभ पंत क्रीझवर आला आहे. त्याच्यासोबत जॅक फ्रेझर मॅकगर्क क्रीझवर आहे.
लखनौ सुपरजायंट्सचा वेगवान गोलंदाज यश ठाकूरने सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला बोल्ड करून दिल्ली कॅपिटल्सला पहिला धक्का दिला. वॉर्नरला ९ चेंडूत ९ धावा करत आल्या.
लखनौ सुपर जायंट्सने २० षटकात ७ गडी गमावून १६७ धावा केल्या आणि दिल्लीसमोर १६८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. क्विंटन डी कॉक आणि केएल राहुल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी २८ धावांची भागीदारी झाली, मात्र खलील अहमदने आपल्या घातक गोलंदाजीने ती मोडून काढली. डी कॉकच्या रूपाने त्याने संघाला पहिला धक्का दिला. तो १९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर संघाला दुसरा धक्का देवदत्त पडिक्कलच्या रूपाने बसला, तोही खलीलच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू झाला. त्याला केवळ ३ धावा करता आल्या.
एकना स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात दिल्लीच्या गोलंदाजांनी छाप पाडली. खलीलनंतर कुलदीप यादवनेही धुमाकूळ घातला. त्याने पहिल्याच षटकात लागोपाठ २ चेंडूत २ विकेट घेतल्या. डावाच्या आठव्या षटकात त्याने स्टॉइनिस (८) आणि निकोलस पूरन (००) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर स्टार फिरकीपटूने १०व्या षटकात लखनऊचा कर्णधार केएल राहुलला बाद केले. तो २२ चेंडूंत ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३९ धावा करून परतला.
त्याचवेळी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून फलंदाजीला आलेला दीप हुड्डाही काही विशेष दाखवू शकला नाही. त्याला इशांत शर्माने १९ धावांवर बाद केले.
यानंतर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कृणाल पांड्याला केवळ ३ धावा करता आल्या. ९४ धावांवर संघाने ७ विकेट गमावल्या होत्या. अशा स्थितीत आयुष बडोनी आणि अर्शद खान यांच्यात आठव्या विकेटसाठी ७३ धावांची नाबाद भागीदारी झाली. यादरम्यान बडोनीने ५५ धावांची शानदार खेळी केली. या नाबाद खेळीदरम्यान त्याने १५७.१४ च्या स्ट्राईक रेटने ५ चौकार आणि १ षटकार मारला. त्याने ३१ चेंडूत आपल्या आयपीएल कारकिर्दीतील चौथे अर्धशतक झळकावले. तर अर्शदने २० धावा केल्या. या सामन्यात दिल्लीकडून कुलदीप यादवने ३ तर खलील अहमदने २ बळी घेतले. तर इशांत आणि मुकेशने प्रत्येकी एक विकेट घेतली.
दीपक हुडाच्या रूपाने लखनौला सहावा धक्का बसला. तिसऱ्याच षटकात इशांत शर्मा बाद झाला. प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेल्या हुड्डाला केवळ १० धावा करता आल्या. १२ षटकांनंतर संघाची धावसंख्या ६ बाद ९० आहे.
दुखापतीनंतर या सामन्यात पुनरागमन करणारा कुलदीप यादव लखनौविरुद्ध धुमाकूळ घालत आहे. त्याने कर्णधार केएल राहुलला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याची ही तिसरी विकेट आहे. या सामन्यात ३९ धावा करून राहुल बाद झाला. १० षटकांनंतर संघाची धावसंख्या ५ बाद ८० आहे.
कुलदीप यादवने लखनौला तिसरा धक्का दिला. त्याने त्याच्या पहिल्याच षटकात सलग दोन विकेट घेतल्या. प्रथम त्याने स्टॉइनिसला इशांत शर्माकरवी झेलबाद केले. यानंतर त्याने निकोलस पूरनला बोल्ड केले. पूरन गोल्डन डकवर बाद झाला तर स्टॉइनिस केवळ ८ धावा करू शकला. सध्या केएल राहुल आणि दीपक हुडा क्रीजवर आहेत. ७.४ षटकांनंतर संघाची धावसंख्या ४ बाद ६६ आहे.
२८ धावांच्या स्कोअरवर खलील अहमदने लखनौला पहिला धक्का दिला. तिसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने क्विंटन डी कॉकला एलबीडब्ल्यू बाद केले. डी कॉक १९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. देवदत्त पडिक्कल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. तीन षटकांनंतर संघाची धावसंख्या २८/१ आहे.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध लखनौ सुपरजायंट्सचा डाव सुरू झाला आहे. क्विटन डी कॉक आणि कर्णधार केएल राहुल लखनौसाठी डावाची सुरुवात करण्यासाठी आले आहेत. दिल्लीसाठी वेगवान गोलंदाज खलील अहमदने गोलंदाजीची सुरुवात केली आहे.
लखनौ सुपर जायंट्स: क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, अर्शद खान, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, यश ठाकूर.
इम्पॅक्ट सब: कृष्णप्पा गौतम, दीपक हुडा, मणिमरन सिद्धार्थ, अमित मिश्रा, मॅट हेन्री.
दिल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, जेक फ्रेझर-मॅकगर्क, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद.
इम्पॅक्ट सब: झाय रिचर्डसन, अभिषेक पोरेल, कुमार कुशाग्रा, सुमित कुमार, प्रवीण दुबे.
लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. केएल राहुलने सांगितले की, अर्शद खानच्या रूपाने प्लेइंग ११ मध्ये एक बदल करण्यात आला आहे. घातक गोलंदाज मयंक यादवच्या जागी त्याचा समावेश करण्यात आला आहे.
त्याचवेळी दिल्लीचा संघ दोन बदलांसह खेळताना दिसणार आहे. मुकेश कुमार आणि कुलदीप यादव परतले आहेत.
आयपीएलच्या इतिहासात लखनौ आणि दिल्लीचा संघ एकूण ३ वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी तिन्ही सामन्यात लखनौच्या संघाने विजय मिळवला आहे. लखनौची दिल्लीविरुद्ध सर्वोत्तम धावसंख्या १९५ आहे. तर, दिल्लीची लखनौविरुद्ध सर्वाधिक धावसंख्या १८९ इतकी आहे. दोन्ही संघामध्ये अखेरचा सामना २०१३ मध्ये खेळला गेला. या सामन्यात लखनौने ५० धावांनी विजय मिळवला होता.
संबंधित बातम्या