IPL 2024: आयपीएल २०२४ च्या २६व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स आज (१२ एप्रिल २०२४) एकमेकांशी भिडणार आहेत. हा सामना लखनौच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांच्या समोर येणार आहेत. यापूर्वी हा सामना लाइव्ह कुठे पाहता येईल, हे जाणून घेऊयात.
आयपीएल २०२४ च्या गुणतालिकेत लखनौचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. तर, दिल्लीचा संघ गुणतालिकेच्या तळाशी आहे. लखनौने चार पैकी तीन सामने जिंकले आहेत आणि दिल्लीच्या संघाला पाच पैकी चार सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. लखनौने त्यांच्या अखरेच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. या सामन्यात लखनौचा स्टार ऑलराऊंडर मार्कस स्टॉयनिसने ५८ धावांची वादळी खेळी केली होती. तर, यश ठाकूरने ५ विकेट घेतल्या होत्या.
लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात शुक्रवारी (१२ एप्रिल २०२४) आयपीएलमधील २६ वा सामना खेळला जाईल. हा सामना लखनौच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, लखनौ आणि दिल्ली यांच्यातील सामना सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजीसह देशातील इतर भाषांमध्ये पाहू शकतो. जिओ सिनेमा ॲपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. याशिवाय, https://marathi.hindustantimes.com/ वर सामन्याशी संबंधित बातम्या, लाइव्ह अपडेट्स आणि रेकॉर्डही वाचू शकता.
पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, अभिषेक पोरेल, ऋषभ पंत (कर्णधार, विकेटकिपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, झ्ये रिचर्डसन, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा, खलील अहमद, कुमार कुशाग्रा, यश धुल, जेक फ्रेसर -मॅकगर्क, सुमित कुमार, प्रवीण दुबे, मिचेल मार्श, कुलदीप यादव, लिझाद विल्यम्स, रिकी भुई, शाई होप, मुकेश कुमार, रसिक दार सलाम, विकी ओस्तवाल, स्वस्तिक चिकारा.
क्विंटन डी कॉक, केएल राहुल (कर्णधार, विकेटकिपर), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, यश ठाकूर, नवीन-उल-हक, मयंक यादव, मणिमरन सिद्धार्थ, दीपक हुडा, अमित मिश्रा, युधवीर सिंग चरक, अर्शद खान, काइल मेयर्स, ॲश्टन टर्नर, कृष्णप्पा गौथम, मॅट हेन्री, प्रेरक मंकड, मोहसीन खान, शमर जोसेफ, अर्शीन कुलकर्णी.