IPL 2024: चार सामन्यांतून सलग तीन विजय नोंदविणाऱ्या लखनौ सुपर जायंट्स चा संघ शुक्रवारी इकाना स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्ससंघाविरुद्ध खेळताना आपले वर्चस्व वाढविण्याच्या प्रयत्नात असेल. या हंगामात दिल्लीची सुरुवात खराब झाली आहे. दिल्लीला पाच सामन्यांपैकी केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. लखनौने त्यांच्या अखेरच्या सामन्यात यश ठाकूरच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर गुजरात टायटन्सला पराभूत केले.
२०२० च्या उपविजेत्या संघाने पृथ्वी शॉ आणि ट्रिस्टियन स्टब्स यांच्या दमदार धावांचा पाठलाग केला, पण मुंबई इंडियन्सने केलेल्या २३५ धावांच्या विशाल धावसंख्येसमोर त्यांना अपयश आले. या हंगामात दोनवेळा २००+ धावा करूनही दिल्लीला पराभव स्वीकारावा लागला. यजमान लखनौ आयपीएल २०२४ च्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे, तर रिषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सला मागील सामन्यात पराभव पत्करावा लागला.
आयपीएलच्या इतिहासात लखनौ आणि दिल्लीचा संघ एकूण ३ वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी तिन्ही सामन्यात लखनौच्या संघाने विजय मिळवला आहे. लखनौची दिल्लीविरुद्ध सर्वोत्तम धावसंख्या १९५ आहे. तर, दिल्लीची लखनौविरुद्ध सर्वाधिक धावसंख्या १८९ इतकी आहे. दोन्ही संघामध्ये अखेरचा सामना २०१३ मध्ये खेळला गेला. या सामन्यात लखनौने ५० धावांनी विजय मिळवला होता.
केएल राहुल, मार्कस स्टोइनिस आणि निकोलस पूरन हे आयपीएलमधील इकाना स्टेडियमवर सर्वाधिक धावा करणारे पाच फलंदाज आहेत, जे दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या एलएसजीच्या लढतीतही खेळण्याची शक्यता आहे. हे तिघेही उत्तम फॉर्मात असल्याने ते डीसी बॉलिंग युनिटमधून कसे मार्ग काढतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉइनिस, देवदत्त पडिक्कल, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, यश ठाकूर, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, एम सिद्धार्थ.
डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, ललित यादव, अक्षर पटेल, झ्ये रिचर्डसन, इशांत शर्मा, खलील अहमद, रसिक दार/सुमित कुमार.