LSG vs DC Dream 11 Prediction : आज ड्रीम इलेव्हनवर या विकेटकीपरला करा तुमचा कर्णधार, मालामाल व्हाल!
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  LSG vs DC Dream 11 Prediction : आज ड्रीम इलेव्हनवर या विकेटकीपरला करा तुमचा कर्णधार, मालामाल व्हाल!

LSG vs DC Dream 11 Prediction : आज ड्रीम इलेव्हनवर या विकेटकीपरला करा तुमचा कर्णधार, मालामाल व्हाल!

Published Apr 12, 2024 04:53 PM IST

lsg vs dc dream 11 prediction : आयपीएल २०२४ चा २६ वा सामना आज लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघ लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत.

lsg vs dc dream 11 prediction ipl 2024
lsg vs dc dream 11 prediction ipl 2024

lsg vs dc todays match dream 11 prediction : आयपीएल २०२४ मध्ये आज लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना आज (१२ एप्रिल) सायंकाळी लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

 लखनौने गेल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. त्याचवेळी दिल्लीची स्थिती या हंगामात खूपच वाईट आहे. या संघाला आतापर्यंत खेळलेल्या ५ पैकी केवळ एकच सामना जिंकता आला आहे. 

दरम्यान, लखनौ असो की दिल्ली, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

यष्टिरक्षक

दिल्ली आणि लखनौ यांच्यात होणाऱ्या या सामन्यात यष्टीरक्षकांची फौज दिसणार आहे. दिल्लीकडे ऋषभ पंत आणि ट्रिस्टन स्टब्स आहेत. तर लखनौकडे निकोलस पुरन, केएल राहुल आणि क्विंटन डीकॉक आहेत. हे सर्वजण या आयपीएलमध्ये चांगल्या फॉर्मात आहेत.

फलंदाज

डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ आणि ट्रिस्टन स्टब्स हे फलंदाज म्हणून सर्वोत्तम पर्याय असतील. स्टब्सने गेल्या सामन्यात बॅटने चांगलाच कहर केला आहे. मुंबई विरुद्धच्या सामन्यात स्टब्सने केवळ २५ चेंडूंचा सामना करत ७१ धावांची तुफानी खेळी केली होती. त्याचबरोबर वॉर्नरही चांगल्या फॉर्ममध्ये दिसला आहे.

अष्टपैलू

अक्षर पटेल आणि कृणाल पंड्या हे अष्टपैलू म्हणून सर्वोत्तम पर्याय असतील. लखनौची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना खूप मदत करते. मागील सामन्यात क्रुणालने या मैदानावर ४ षटकांच्या स्पेलमध्ये केवळ ११ धावा देत ३ बळी घेतले होते. तसेच, तुम्ही मार्कस स्टॉइनिस देखील तुमच्या ड्रीम इलेव्हनमध्ये ठेवू शकता. स्टॉइनिसने गेल्या सामन्यात ५८ धावांची झटपट खेळी केली होती.

गोलंदाज

गोलंदाजीत यश ठाकूर आणि खलील अहमद हे सर्वोत्तम पर्याय असतील. यशने याच मैदानावर गुजरात टायटन्सविरुद्ध ५ विकेट घेतल्या होत्या. त्याचबरोबर खलील दिल्लीकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे.

LSG vs DC Dream 11 Team

विकेटकीपर - केएल राहुल, क्विंटन डी कॉक (कर्णधार), निकोलस पूरन, ऋषभ पंत

फलंदाज - डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, ट्रिस्टन स्टब्स

अष्टपैलू - अक्षर पटेल, कृणाल पंड्या (उपकर्णधार)

गोलंदाज - यश ठाकूर, खलील अहमद

Whats_app_banner

संबंधित बातम्या