KKR Vs LSG Match Scorecard : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) च्या १७व्या हंगामातील २८ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) सामना लखनौ सुपर जायंट्सशी (LSG) होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. या सामन्यात लखनौने प्रथम फलंदाजी करताना कोलकातासमोर विजयासाठी १६२ धावांचे लक्ष्य ठेले आहे.
तत्पूर्वी, केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी आलेल्या लखनौची सुरुवात खराब झाली. त्यांचा सलामीवीर क्विंटन डी कॉक तिसऱ्याच षटकात स्वस्तात बाद झाला. यानंतर केएल राहुलने डाव सावरला. केएल राहुलने ३९ धावा (२७ चेंडू, ३ चौकार, २ षटकार) आणि आयुष बडोनीने २९ धावांचे (२७ चेंडू, २ चौकार, १ षटकार) योगदान दिले.
लखनौकडून निकोलस पुरनने सर्वाधिक ४५ धावांची खेळी खेळली. निकोलस पुरनने ३२ चेंडूंच्या खेळीत ४ षटकार आणि २ चौकार लगावले. त्याच्या फलंदाजीच्या बळावरच लखनौने १६१ धावांपर्यंत मजल मारली.
कोलकाताकडून मिचेल स्टार्कने अप्रतिम गोलंदाजी करत ३ बळी घेतले. तर सुनील नरेन, वैभव अरोरा, आंद्रे रसेल आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी १ विकेट मिळाली.
कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), दीपक हुडा, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, शामर जोसेफ, यश ठाकूर.
संबंधित बातम्या