IPL 2024: क्विंटन डी कॉकची ऐतिहासिक कामगिरी, आयपीएलमध्ये गाठला महत्त्वाचा टप्पा, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी-lsg quinton de kock joins ab de villiers in exclusive club with sublime 81 vs rcb at ipl 2024 ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024: क्विंटन डी कॉकची ऐतिहासिक कामगिरी, आयपीएलमध्ये गाठला महत्त्वाचा टप्पा, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी

IPL 2024: क्विंटन डी कॉकची ऐतिहासिक कामगिरी, आयपीएलमध्ये गाठला महत्त्वाचा टप्पा, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी

Apr 02, 2024 10:41 PM IST

Quinton de Kock joins AB De Villiers Exclusive Club: आयपीएल २०२४ मध्ये एलएसजी आणि आरसीबी यांच्यातील सामन्यात क्विंटन डी कॉकने ८१ धावांची खेळी करत अनेक विक्रम मोडले.

आरसीबीविरुद्ध वादळी अर्धशतकासह क्विंटन डी कॉकने खास विक्रमाला गवसणी घातली.
आरसीबीविरुद्ध वादळी अर्धशतकासह क्विंटन डी कॉकने खास विक्रमाला गवसणी घातली. (PTI)

IPL 2024: आयपीएलच्या २०२४ च्या हंगामात लखनौ सुपर जायंट्सचा स्टार फलंदाज क्विंटन डी कॉकने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्यात जबरदस्त फलंदाजी केली. या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून पाहुण्यांना फलंदाजीचे आमंत्रण दिल्यानंतर लखनौसाठी फलंदाजीसाठी आलेल्या क्विंटन डी कॉक वादळी अर्धशतक झळकावून नव्या विक्रमाला गवसणी घातली.

या सामन्यात डिकॉकने अवघ्या ३६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे क्विंटन डी कॉकच्या आयपीएल कारकिर्दीतील २२ वे शतक ठरले. या कामगिरीसह त्याने अनेक विक्रमाला गवसणी घातली. क्विंटन डी कॉकने आयपीएलमधील ३००० धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. तसेच टी-२० स्पर्धेत तीन हजार धावा पूर्ण करणारा दक्षिण आफ्रिकेचा तो २३ वा खेळाडू ठरला . आयपीएलमध्ये ३ हजार धावा करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांच्या यादीत एबी डिव्हिलियर्स (५ हजार १६२ धावा) आणि फाफ डु प्लेसिस (४ हजार १७९ धावा) यांच्यापाठोपाठ स्थान मिळवले आहे.

 

आयपीएलमध्ये सर्वात जलद ३००० धावा

१) ख्रिस गेल- ७५ डाव

२) डेव्हिड वॉर्नर- ९४ डाव

३) सुरेश रैना- १०३ डाव

४) एबी डिव्हिलियर्स- १०४ डाव

५) रोहित शर्मा- १०९ डाव

 

आरसीबीविरुद्ध सामन्यात डी कॉकने १४४.५४ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. डी कॉकने आपल्या खेळीत ८ चौकार आणि ५ षटकार लगावले. त्याने ५६ चेंडूत ८१ धावा पूर्ण केल्या. तर, वेस्ट इंडिजचा पॉवर हिटर निकोलस पूरन २१ चेंडूत नाबाद ४० धावांवर नाबाद राहिला. पूरनच्या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर एलएसजीने २० षटकांत ५ बाद १८१ धावांपर्यंत मजल मारली. आरसीबीकडून मॅक्सवेलने चार षटकांत दोन विकेट्स घेतल्या आणि २३ धावा दिल्या.

विभाग