इंडियन प्रीमियर लीगमध्ये श्रींलकेचा स्टार गोलंदाजा मथिषा पाथीराना चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो. पाथिराने आयपीएल २०२२ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर मथिषा पाथिरानाला जगभरात ओळख मिळाली.
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना पाथिराना जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक म्हणून उदयास आला आहे. तो आयपीएल २०२४ संपूर्ण हंगाम खेळू शकला नाही. पण आता त्याने लंका प्रीमियर लीग (LPL) मध्ये खळबळ उडवून दिली आहे.
लंका प्रीमियर लीगच्या लिलावामध्ये (LPL 2024 Auction) कोलंबो स्ट्रायकर्सने त्याला १,२०,००० यूएस डॉलर्समध्ये खरेदी केले आहे. यासह तो एलपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
पाथिरानापूर्वी, हा विक्रम दिलशान मधुशंकाच्या नावावर होता, ज्याला जाफना किंग्सने LPL २०२३ च्या लिलावात $९२,००० म्हणजेच भारतीय चलनात ७६.६ लाख रुपयांना विकत घेतले होते.
पाथीरानाने गेल्या मोसमात कोलंबो स्ट्रायकर्सकडून लंका प्रीमियर लीगमध्ये पदार्पण केले होते. पण २०२४ च्या लिलावापूर्वी त्याला रीलीज करण्यात आले. आता एलपीएल लिलाव २०२४ मध्ये, कोलंबो संघाने राईट टू मॅच प्रक्रियेअंतर्गत त्याला १,२०,००० डॉलर्समध्ये विकत घेतले आहे. त्याचे भारतीय चलनात रूपांतर केल्यास पाथीरानाची किंमत ९९ लाख ९० हजार रुपये आहे.
त्याचबरोबर श्रीलंकेच्या चलनात पाथीरानावर ३.५९ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली आहे. पाथीरानाची बेस प्राइस ५० हजार अमेरिकन डॉलर होती. दाम्बुला थंडर्स आणि गाले मार्व्हल्स यांनीही त्याच्यावर बोली लावली, परंतु कोलंबो स्ट्रायकर्सची $१२०,००० ची बोली कोणीही पार करू शकले नाही.
मथिशा पाथिराना व्यतिरिक्त कोलंबो स्ट्रायकर्सने बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्किन अहमदला ५० हजार अमेरिकन डॉलरमध्ये खरेदी केले आहे. या संघात अफगाणिस्तानचा खेळाडू रहमानउल्ला गुरबाद देखील आहे. चमिका करुणारत्ने, थिसारा परेरा, सदिरा समरविक्रमा, निपुण धनंजय, शादाब खान आणि ग्लेन फिलिप्स या आंतरराष्ट्रीय स्टार्सचाही या संघात समावेश आहे.
पाथिरानाबद्दल बोलायचे झाले तर त्याची LPL मधील किंमत IPL पेक्षा पाचपट जास्त आहे, कारण CSK संघात खेळण्यासाठी त्याला २० लाख रुपये मिळतात.
संबंधित बातम्या